शुक्र ग्रहाचे हस्त नक्षत्रात होणार भ्रमण, ‘या’ 3 राशींच्या लोकांचे बदलणार भाग्य
पंचांगानुसार 17 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह उत्तराफाल्गुन मधून हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हस्त नक्षत्रात शुक्र ग्रहाचे संक्रमण सर्व राशींच्या लोकांवर परिणाम करेल, परंतु या तीन राशींचे भाग्य बदलू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या तीन राशी...

ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाचे परिवर्तन विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, कला, भौतिक सुखसोयी आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानला जातो. तर इतर ग्रहांप्रमाणे शुक्र देखील विशिष्ट काळात आपले राशी आणि नक्षत्र बदलतो. शुक्र ग्रहाच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाचा सर्व 12 राशींच्या लोकांवर व्यापक प्रभाव पडतो. या महिन्यात शुक्र ग्रह आपले नक्षत्र बदलणार आहे.
शुक्र ग्रहाचे हे नक्षत्र परिवर्तन 17 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. त्यात शुक्र ग्रह सध्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातून भ्रमण करत आहे. द्रिक पंचांगानुसार 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी शुक्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातून हस्त नक्षत्रात प्रवेश करेल. हस्त नक्षत्रात शुक्र ग्रहाचे भ्रमण सर्व राशींच्या लोकांवर परिणामकारक ठरणार आहे. परंतु या दिवसांमध्ये या तीन राशींच्या अंतर्गत लोकांचे भाग्य बदलू शकते. त्यांच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
मकर रास
शुक्र ग्रहाचे हे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. या दिवसांमध्ये मकर राशीच्या लोकांना त्यांच्या नोकरी किंवा व्यवसायात लक्षणीय फायदा होऊ शकतो, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तसेच या राशीच्या लोकांना त्यांचे घर सजवण्यात रस घेऊ शकतात आणि त्यांच्या घरगुती जीवनात शांती आणि आनंद अनुभवू शकतात. कला, संगीत किंवा सर्जनशील क्षेत्रात गुंतलेल्यांना आदर आणि सन्मान मिळू शकतो.
तुला रास
शुक्र ग्रह हा तूळ राशीचा स्वामी ग्रह मानला जातो, म्हणून शुक्र ग्रहाचे हे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी खास असू शकते. या दिवसांमध्ये तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच या राशीचे लोकं महागड्या वस्तू खरेदी करू शकतात. त्यांचे कामाचे जीवन संतुलित राहू शकते.
वृषभ रास
शुक्र ग्रह हा वृषभ राशीचा देखील स्वामी ग्रह आहे. शुक्र ग्रहाचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांमध्ये नवीन ऊर्जा आणू शकते. कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढू शकतो. भौतिक सुखसोयी मिळू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येऊ शकते. विलासी वस्तू खरेदी करण्याच्या संधी मिळू शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा वाढू शकतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
