उपवासाच्या काळात करू नयेत या गोष्टी, अन्यथा या 5 कारणांमुळे मोडू शकतो उपवास, प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?
हिंदू धर्मात जितके पूजेचे महत्त्व आहे तितकेच उपवासाचेही तितकेच महत्त्व असते. पण उपवासाबद्दल किंवा व्रत करण्याबद्दल काही नियम आपल्या शास्त्रात सांगण्यात आले आहेत. ज्याबद्दल प्रेमानंद जी महाराजांनीही सांगितलं आहे.

प्रेमानंद जी महाराजांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी उपवास का मोडता येतो याची कारणे सांगितली आहेत. अशा परिस्थितीत, उपवास करताना झालेल्या चुकांबद्दल महाराजजींकडून जाणून घेऊया…
हिंदू धर्मात जितके पूजेचे महत्त्व आहे तितकेच उपवासाचेही तितकेच महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, देव-देवतांवर श्रद्धा तर असतेच पण काही नियमांनुसार उपवास न केल्याने व्यक्तीला अशुभ फळे मिळण्याची शक्यता असतेय. विशेषतः सण किंवा काही विशेष तारखेला ठेवल्या जाणाऱ्या उपवासांचे काही विशेष नियम असतात, जे पाळणे खूप महत्वाचे मानले जाते.
प्रत्येक व्रताचे, उपवासाचे काही नियम शास्त्रांमध्ये सांगितले आहेत.
प्रत्येक व्रताचे, उपवासाचे काही नियम शास्त्रांमध्ये सांगितले आहेत. या नियमांचे पालन न केल्याने उपवास अपूर्ण राहू शकतो किंवा मोडू शकतो. त्यात आता श्रावण आहे. त्यामुळे या महिन्यात नक्कीच अनेकांचे व्रत-उपवास असतात. त्यामुळे त्याबाबतही काही गोष्टी पाळणे गरजेच असते.
प्रेमानंद जी महाराजांनी त्यांच्या प्रवचनात उपवासाबाबत काही गोष्टी सांगितल्या
अलीकडेच प्रेमानंद जी महाराजांनी त्यांच्या प्रवचनात उपवासाबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर महाराजांकडून जाणून घेऊया कोणत्या चुकांमुळे उपवास मोडू शकतो किंवा उपवास-व्रतादरम्यान कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत हे देखील त्यांनी सांगितलं आहे.
या कारणांमुळे उपवास मोडला जाऊ शकतो
प्रेमानंद महाराजांनी त्यांच्या प्रवचनात सांगितले की, उपवास करणाऱ्यांनी काही महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत, अन्यथा उपवास अपूर्ण मानला जातो. महाराजांनी सांगितले की, >उपवास करणाऱ्याने वारंवार शौचालयात जाणे टाळावे. कारण असे केल्याने उपवासाचे पावित्र्य भंग होऊ शकते. > याशिवाय, उपवास करणाऱ्याने काही कारणात्सव दिवसा झोपू नये. त्यामुळे शरीरात आळस, मरगळ येऊ सकते. त्यामुळे उपवासासाठी हवं असणारं पावित्र्य मनात निर्माण होत नाही. >तसेच त्यांनी असेही सांगितले की, उपवास केला असेल किंवा व्रत केलं असेल तर त्यादिवशी कमी बोलण्याचा किंवा मौन धारण करण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास जप करा.
उपवास मोडण्याची इतर कारणे
प्रेमानंद महाराजांच्या मते, >उपवास करताना खोटे बोलणाऱ्या किंवा इतरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांचे उपवास पूर्ण मानले जात नाही. >तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. जर हा नियम दुर्लक्षित केला तर उपवास मोडू शकतो आणि साधनेचे फळ मिळत नाही.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
