तुमचे आयुष्य कमी करतील, या पाच सवयी सोडा ; उत्तम आरोग्यासाठी सविस्तर जाणून घ्या

गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात, ते त्यांचे आयुष्य कमी करतात. कारण सकाळी ब्रह्मा मुहूर्तामध्ये अधिक शुद्ध हवा असते. या हवेमुळे अनेक आजार बरे होतात. व्यक्तीला श्वसनाचे आजार राहत नाहीत व त्याचे वय वाढते.

तुमचे आयुष्य कमी करतील, या पाच सवयी सोडा ; उत्तम आरोग्यासाठी सविस्तर जाणून घ्या
अशा व्यक्तीच्या आयुष्यात त्रास कधीच संपत नाही

मुंबई : गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक मानले जाते. असे मानले जाते की भगवान विष्णूंनी त्यात नमूद केलेल्या सर्व गोष्टींचे वर्णन स्वत:च्या मुखाने केले आहे. त्यांनी त्यांचे वाहन असलेल्या गरुडाच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देताना जीवन जगण्याचे धोरण आणि नियम नीट समजावून सांगितले आहेत. तसेच मृत्यूनंतर कर्मांनुसार प्राप्त होणारे लोक, कर्मांचे परिणाम आणि आत्म्याच्या विचलित होण्यापासून पुनर्जन्म होण्यापर्यंतच्या परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. गरुड पुराणात नमूद केलेल्या अशा कर्मांबद्दल आपण याठिकाणी विस्ताराने जाणून घेऊया. अशाी कोणती कर्मे आहेत, जी कर्मे केल्यामुळे माणसाचे आयुष्य कमी होते. (Quit these five habits that will shorten your life; know the details for better health)

1. दहीला आरोग्यदायी अन्न म्हणून मानले जाते. परंतु रात्रीच्या वेळी दही खाणे हे जणू आपण अनेक आजारांना आमंत्रण दिल्यासारखेच आहे. रात्री दही खाल्ल्याने पोटाचे आजार वाढतात. हेच पोटाचे आजार सर्व रोगांचे कारण असतात. म्हणून दही नेहमी दिवसाच्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. रात्री दही खाण्याची सवय सोडली पाहिजे.

2. जर तुम्ही मांसाहारी असाल आणि शीळे मांस खात असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी अनेक त्रास निर्माण करणार आहात. शीळ्या मांसामध्ये धोकादायक जीवाणू वाढतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही ते खाल्ले तर ते जीवाणू तुमच्या पोटापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला सर्व आजारांनी ग्रस्त करतात.

3. गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात, ते त्यांचे आयुष्य कमी करतात. कारण सकाळी ब्रह्मा मुहूर्तामध्ये अधिक शुद्ध हवा असते. या हवेमुळे अनेक आजार बरे होतात. व्यक्तीला श्वसनाचे आजार राहत नाहीत व त्याचे वय वाढते. जे लोक उशिरापर्यंत झोपतात, त्यांना सकाळची जीवनदायी हवा मिळत नाही. अशा स्थितीत ते लोक सर्व आजारांनी ग्रासतात.

4. स्मशानभूमीत मृतदेह जाळल्यानंतर त्या आगीतून बाहेर पडणार्या धुरामध्ये अनेक जीवाणू असतात. ते जीवाणू हवेत मिसळतात व तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या शरीरावर चिकटतात. म्हणून अंत्यसंस्कारानंतर कोणीही तेथे जास्त काळ राहू नये आणि घरी येऊन आंघोळ करावी आणि कपडे व्यवस्थित धुवावेत.

5. गरुड पुराणानुसार सकाळी हस्तमैथून केल्यास किंवा जास्त प्रमाणात हस्तमैथून केल्यास पुरुषांचे आयुष्य कमी होते. तसेच सकाळी शारिरीक संबंध ठेवण्यामुळे शरीर कमजोर होते. यामुळे आपले शरीर रोगांशी लढण्याची शक्ती गमावते. याच कारणामुळे योगी आणि ऋषींनी योग, प्राणायाम आणि ध्यान करण्यासाठी सकाळची वेळ निश्चित केली आहे, जेणेकरून या वेळी शरीरात ऊर्जा साठवता येईल. (Quit these five habits that will shorten your life; know the details for better health)

इतर बातम्या

Pune Metro | पुणे मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत, आता दुसऱ्या टप्प्याचंही नियोजन सुरू, महामेट्रो तयार करणार 82.5 किमी मेट्रोचा आराखडा

पेटवून घेऊन जळत्या अंगाने थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात धाव, पुण्यातील थरार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI