AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ, दोन दिवसात मिळाले इतके दान

Ram Mandir Donation 22 जानेवारीपासून राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून, त्यानंतर मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. 22 जानेवारीनंतर अवघ्या 11 दिवसांत राम मंदिरासाठी 11 कोटींहून अधिक रुपयांची देणगी आली. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रानुसार, 11 दिवसांत सुमारे 25 लाख भाविकांनी रामजन्मभूमीला भेट दिली आहे.

Ram Mandir : अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ, दोन दिवसात मिळाले इतके दान
रामलला Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 09, 2024 | 8:58 AM
Share

मुंबई : अयोध्या राम मंदिरात (Ram Mandir) देणगी देणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शिवाय देणगीची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राम मंदिरासाठी भाविक मनापासून दान करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांत रामभक्तांनी लाखो रुपयांची देणगी दिल्याने याचा अंदाज येतो. उल्लेखनीय आहे की 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठेनंतर मोठ्या संख्येने लोक प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाताना दिसत आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांत 18 लाख 50 हजार रुपयांच्या देणग्या आल्या आहेत. 6 फेब्रुवारीला राम मंदिरासाठी 8.50 लाख रुपयांची देणगी आली, तर 7 फेब्रुवारीला 10 लाख रुपयांची देणगी आली. राम मंदिराच्या अभिषेक दिनी एका दिवसात सर्वाधिक दान करण्यात आले. त्या दिवशी, राम भक्तांनी ऑनलाइन आणि काउंटरवर 3.17 कोटी रुपये दान केले.

11 दिवसांत 11 कोटी रुपयांची देणगी

22 जानेवारीपासून राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून, त्यानंतर मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. 22 जानेवारीनंतर अवघ्या 11 दिवसांत राम मंदिरासाठी 11 कोटींहून अधिक रुपयांची देणगी आली. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रानुसार, 11 दिवसांत सुमारे 25 लाख भाविकांनी रामजन्मभूमीला भेट दिली आहे, गेल्या 10 दिवसांत सुमारे 8 कोटी रुपये दानपेटीत जमा करण्यात आले असून सुमारे 3.50 कोटी रुपये ऑनलाइन प्राप्त झाले आहेत.

त्यामुळे दररोज अनेक लोक भेट देत आहेत

राम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज 2 लाखांहून अधिक भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत. ते म्हणाले की, मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन पथाजवळ चार मोठ्या आकाराच्या दानपेट्या ठेवण्यात आल्या असून त्यामध्ये भाविक पैसे दान करतात. उल्लेखनीय आहे की पैसे मोजण्यासाठी 14 लोकांची टीम आहे, ज्यामध्ये 11 बँक कर्मचारी आणि मंदिर ट्रस्टचे तीन लोक आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली देणग्या मोजल्या जातात, असे त्यांनी सांगितले. राम मंदिर निर्माणामुळे स्थानिकांनाही मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. याशिवाय राज्याच्या तिजोरीतही मोठा महसुल जमा होत आहे.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.