Horoscope 05 April 2021 | मिथून राशीला मोठ्या जबाबदारीचे योग, तूळ राशीला पैशांचा फायदा, तुमचं राशीभविष्य काय सांगतं?

कुणाला सावध राहावं लागणार, कुठल्या राशीला काय मिळणार, चला जाणून घेऊ…(Rashifal Of 05 April 2021 Horoscope Astrology Of Today)

Horoscope 05 April 2021 | मिथून राशीला मोठ्या जबाबदारीचे योग, तूळ राशीला पैशांचा फायदा, तुमचं राशीभविष्य काय सांगतं?
Horoscope

मुंबई : आज सोमवार 5 एप्रिल 2021. सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित असतो. यादिवशी महादेवाची मनोभावे पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे आज तुमचं राशीभविष्य काय सांगतं? कुणाला फायदा होणार (Rashifal Of 05 April), कुणाला सावध राहावं लागणार, कुठल्या राशीला काय मिळणार, चला जाणून घेऊ…(Rashifal Of 05 April 2021 Horoscope Astrology Of Today)

मेष

आज तुम्हाला कर्जाची रक्कम परत मिळू शकेल. आज तुमचा दिवस सामान्य राहिल. तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण कराल. एखादा नवीन प्रकल्प हाती घ्याल. आरोग्याबद्दलच्या तक्रारी वाढतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. तरूणांची आणखी प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखी होईल.

वृषभ

आज तुमचा कुणाशी ना कुणाशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांची तब्येत बिघडू शकते. नातेवाईकांकडून एखादी दुःखद बातमी मिळेल. व्यवसायात फायदा होईल. उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात.

मिथुन

आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हालं. आनंद होईल. मित्रांशी गाठी-भेटी होतील. कार्यालयातील सहकाऱ्यांच्या मदतीने मोठी जबाबदारी पार पाडाल. गुंतवणूकीचा विचार करू शकता. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही जोडीदाराला सरप्राईज देऊ शकता

कर्क

तुमचा दिवस आनंदी असेल. तुमच्या इच्छेनुसार काम पूर्ण होतील. ऑफिसमध्ये चांगली बातमी मिळेल. अविवाहित व्यक्तींना विवाहाचे योग संभवतात. कुटुंबातील वडीलधाऱ्यांची काळजी घ्या. मतभेद होतील. पण त्याचा जास्त ताण घेऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या.

सिंह

आज तुमचे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. करिअरबद्दल मार्गदर्शन मिळेल. एखादी नवीन योजना सुरु कराल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याशी संबंधित तक्रारी जाणवतील. शिक्षण क्षेत्रातही चांगले निकाल लागणार नाहीत. मन विचलित होईल. व्यवसायाची परिस्थिती ठीक होईल. (Rashifal Of 05 April 2021 Horoscope Astrology Of Today)

कन्या

आज सकारात्मक विचारांमुळे तुमचे कौतुक होईल. याचा फायदा तुम्हाला मिळेल. आपल्या जवळचे कोणीतरी आपल्याला मदत करेल. व्यवसायात फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांना नवीन कामासाठी प्रोत्साहित केले जाईल. मित्राशी वाद होऊ शकतो. वृद्धांची सेवा केल्यास शुभ परिणाम मिळतील. आज नशिबाची साथ मिळणार नाही. अभ्यासात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

तूळ

आज आपण कोणत्याही विषयावर काळजीपूर्वक निर्णय घ्यावा, जेणेकरून इतर कोणावरही परिणाम होणार नाही. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. चांगल्या कामावर खर्च होण्याची शक्यता आहे. आपल्याला आपल्या वागण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पैशाचा फायदा होईल. काम चांगले जाईल तुमच्या अडचणी दूर होतील. अज्ञात लोकांपासून सावध रहा. देवाची पूजा कराल

वृश्चिक

आज आरोग्य ठीक राहील. मुलांबरोबर फिरायला जाऊ शकता. विरोधक आज शांत राहतील. कोणाशीही आपल्या गुप्त गोष्टींबाबत चर्चा करु नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. देवाची उपासना करा. वृद्धांची सेवा करा. जमीन मालमत्तेचे वाद मिटू शकतात. तब्येत ठीक असेल. कोणाशी वाद होण्याची शक्यता आहे. एखाद्याच्या बोलण्यामुळे तणाव येऊ शकतो. आर्थिक परिस्थिती ठीक असेल. आजचा दिवस मिश्रित दिवस असेल. व्यस्तता अधिक असेल

मकर

आजचा तुमचा दिवस चांगला जाईल. सामाजिक कार्यात सहकार्य कराल. तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रत्येकजण तुमच्या स्वभावाचे कौतुक करतील. संभाषणादरम्यान सावध रहा. नवीन कामात फायदा होईल. कर्जाची रक्कम परत मिळू शकते. देवाची उपासना करालं.

कुंभ

आज कामाच्या दबावामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जोखीम संबंधित कार्यात जागरूक रहा. विरोधक सक्रीय असतील. कुटुंबाशी संबंधित कामासाठी नातेवाईकांना भेटू शकता. अज्ञात लोकांपासून सावध राहा. जुन्या मित्रांना भेटाल. आजचा दिवस सामान्य असेल. विद्यार्थ्यांना फायदा होईल. वृद्धांचा आशीर्वाद मिळेल.

मीन

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आर्थिक परिस्थिती ठीक राहिल. नवीन कामाचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचं खाणं टाळा. कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडू शकते. पदोन्नतीची मिळू शकते. गोपनीय चर्चा करू नका. तुमच्या आयुष्यातील जोडीदाराबरोबर गोडवा राहील. प्रवास करण्याचा योग आहे. (Rashifal Of 05 April 2021 Horoscope Astrology Of Today)

संबंधित बातम्या : 

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्यानुसार एका पुरुषामध्ये ‘हे’ चार गुण असायलाच हवे…

Gudi Padwa 2021 | कधी आहे गुढीपाडवा, जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI