Shardiya Navtarti 2023 : आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात, घटस्थापनेसाठी मिळतोय फक्त इतकाच वेळ

Shardiya Navratri 2023 नवरात्रीच्या काळात संपूर्ण नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळी पूजा करावी. दोन्ही वेळा मंत्राचा जप करा आणि आरती देखील करा. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचे पठण करणे उत्तम. त्याचे नियमित पठण करत रहा. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा नैवेद्य दाखवा. 

Shardiya Navtarti 2023 : आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात, घटस्थापनेसाठी मिळतोय फक्त इतकाच वेळ
नवरात्री Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 9:20 AM

मुंबई : आश्विन शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2023) आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी शारदीय नवरात्रीची सुरुवात आज 15 ऑक्टोबरपासून होईल आणि 24 ऑक्टोबरला दसऱ्याने समाप्त होईल. प्रतिपदा तिथीला घटस्थापनेने नवरात्रीची सुरुवात होते. घटस्थापनामध्ये देवीच्या नावाने कलशाची स्थापना केली जाते. त्यानंतरच देवीच्या व्रत आणि पूजा सुरू होते. चला जाणून घेऊया शारदीय नवरात्रीत आज घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे. घटस्थापनेच्या विधीबद्दलही आपण जाणून घेऊया.

घटस्थापनेचा मुहूर्त

नवरात्रीच्या काळात घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिप्रदा तिथीला केली जाते. अभिजीत मुहूर्तावर घटस्थापना करणे शुभ मानले जाते. अभिजीत मुहूर्त आज 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.44 ते 12:30 पर्यंत आहे. 46 मिनिटांच्या या कालावधीत तुम्ही घटस्थापना करू शकता.

घटस्थापना विधी

कलश हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. त्यामुळे शुभ कार्यापूर्वी कलश बसवणे बंधनकारक आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या पूजेपूर्वी कलश स्थापित केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून उपवास व पूजा करण्याचा संकल्प करावा. यानंतर, पाण्याने भरलेले कलश  घ्यावे.

हे सुद्धा वाचा

घटस्थापनेमध्ये सर्व प्रथम कलशावर मौली धागा गुंडाळा. यानंतर कलशामध्ये आंब्याची पाने टाकावी, कलशात एक सुपारी आणि नाणे टाकावे त्यानंतर त्यावर नारळ ठेवावे. हे कलश देवीच्या उजव्या बाजूला ठेवावे. यानंतर उदबत्ती आणि दिवा लावून दुर्गा देवीचे आवाहन करा आणि षोडशोपचार पुजा करा.

नवरात्रीत रोज पूजा कशी करावी?

नवरात्रीच्या काळात संपूर्ण नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळी पूजा करावी. दोन्ही वेळा मंत्राचा जप करा आणि आरती देखील करा. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचे पठण करणे उत्तम. त्याचे नियमित पठण करत रहा. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा नैवेद्य दाखवा.

शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या घरात पवित्रता ठेवा. सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करावी. जर तुम्ही व्रत ठेवत असाल तर फक्त पाणी आणि फळांचे सेवन करा. घरात लसूण, कांदा किंवा मांस खाण्यास मनाई आहे. व्रत पाळणाऱ्यांनी काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नयेत. ज्या ठिकाणी कलश आणि अखंड ज्योती प्रज्वलित केल्या जातात त्या ठिकाणचे पावित्र्य जपा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.