Shravan 2022: बारा जोतिर्लिंगाच्या स्वरूपात आहे इंदौरचे आनंदेश्वर महादेव मंदिर, महत्त्व आणि इतिहास

या मंदिरात 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपात 12 शिवलिंगे आहेत. 11 शिवलिंग सामान्य आकाराचे आहेत तर मध्यभागी एक विशाल शिवलिंग स्थापित केले आहे. येथे भाविक 12 ज्योतिर्लिंगांची पूजा व अभिषेक करण्यासाठी येतात. 

Shravan 2022: बारा जोतिर्लिंगाच्या स्वरूपात आहे इंदौरचे आनंदेश्वर महादेव मंदिर, महत्त्व आणि इतिहास
आनंदेश्वर महादेव मंदिर
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Aug 07, 2022 | 11:00 AM

Shravan 2022: इंदौरच्या सुदामा नगरमध्ये असलेले आनंदेश्वर महादेव मंदिर (Anandeshwar Mahadev Mandir) हे परिसरातील श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे. सोमवार, महाशिवरात्री, प्रदोष, हरितालिका तीज आणि श्रावण सोमवारी (Shravan somwar) येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. या मंदिरात 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपात 12 शिवलिंगे आहेत. 11 शिवलिंग सामान्य आकाराचे आहेत तर मध्यभागी एक विशाल शिवलिंग स्थापित केले आहे. येथे भाविक 12 ज्योतिर्लिंगांची पूजा व अभिषेक करण्यासाठी येतात.  मंदिरात केवळ शिवलिंगच नाही तर शिव परिवाराच्या मूर्तींचीही स्थापना करण्यात आली आहे. श्रावण महिन्यात मंदिरात विशेष अभिषेक केला जातो आणि विशिष्ट सणांवर विधी, सजावट आणि प्रवचन केले जाते. मंदिरात इतर देवतांच्याही मूर्ती आहेत, त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्री, हनुमान जयंती, श्री कृष्ण जन्माष्टमी, भैरवष्टमी या दिवशीही विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात.

मंदिराचा इतिहास

महादेवाचे हे मंदिर 1969 मध्ये बांधले गेले आहे. ज्या वेळी ही वसाहत बांधली गेली, त्या वेळी दयाल गुरू यांनी शिवमंदिरही बांधले होते, जे नंतर रहिवासी संघाच्या ताब्यात देण्यात आले. सुरुवातीच्या काळात फक्त शिवमंदिर आणि हनुमान मंदिर होते. नंतर मंदिर परिसरात शारदा, भैरव, शीतला माता आणि कृष्ण-सुदामा यांची मंदिरे बांधण्यात आली. मंदिराच्या आवारात उद्यानही असून भूजल पातळी चांगली असल्याने शिवलिंगावर अर्पण केलेले पाणीही जमिनीत मुरते म्हणून जल पुनर्भरणाची व्यवस्था आहे.

महत्त्व

मंदिराविषयी भाविकांमध्ये खूप श्रद्धा आहे. असे मानले जाते की, येथे स्थापित शिवलिंगाची पूजा केल्याने जीवनात सुख प्राप्त होते आणि संकटांचा नाश होतो. भगवान शिव येथे सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात. येथे दररोज अनेक भाविक आपल्या मनोकामना घेऊन येतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर येथे भक्तांकडून नामजप, विधी, कथाही केल्या जातात, तर काही भाविक महाप्रसादही करतात. येथे 12 ज्योतिर्लिंगांच्या रूपात स्थापन केलेल्या 12 शिवलिंगांची पूजा केल्याने त्या ज्योतिर्लिंगांच्या पूजेचे फळ मिळते, अशीही भाविकांची एक श्रद्धा आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें