AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shravan Month 2021 : श्रावण महिन्यातील पहिले विनायक चतुर्थी व्रत? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

हिंदू धर्मात प्रत्येक पूजा आणि उपवासाला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. या महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या तिथीला साजरी केली जाते. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली जाते.

Shravan Month 2021 : श्रावण महिन्यातील पहिले विनायक चतुर्थी व्रत? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व
Lord Ganesha
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 2:18 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक पूजा आणि उपवासाला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. या महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या तिथीला साजरी केली जाते. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली जाते.

मान्यता आहे की भागवान गणेश आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे, सर्व दुःख दूर करतात. या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीला धनलाभ होते. श्रावण महिन्याची पहिली विनायक चतुर्थी 12 ऑगस्ट 2021 रोजी साजरी केली जाईल. श्रावणमधील विनायक चतुर्थीच्या पूजेची पद्धत आणि शुभ मुहूर्त याबद्दल जाणून घेऊया.

श्रावण विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त

? विनायक चतुर्थी तिथी प्रारंभ – 11 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 04:53 पासून

? विनायक चतुर्थी तिथी समाप्त – 12 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 03:24 पर्यंत

विनायक चतुर्थी पूजेची पद्धत

? विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे.

? या दिवशी पूजास्थळ स्वच्छ करुन गंगाजल शिंपडा. आपण मंदिरात पूजा देखील करु शकता.

? गणपतीची मूर्ती स्थापित करा आणि त्यांच्यासमोर दिवा प्रज्वलित करा .

? त्यानंतर गणपतीला लाल कुंकू, अक्षता, फुले इत्यादी अर्पण करा.

? गणेशाला मोदकाचे नैवेद्य दाखवा.

? यानंतर गणेश पाठाचे पठण करा आणि नंतर आरती करावी.

विनायक चतुर्थीचे महत्व काय?

भगवान गणेशाला शक्ती, सामर्थ्य, बुद्धी आणि भरभराटीचे देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की, जर कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी विधीवत गणरायाची पूजा करते, तर त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला गणेशाच्या आशीर्वादाने आयुष्यात यश मिळेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Hanuman Ji Puja Tips | हनुमानजींची पूजा करताना नेहमी दिशांचे नियम पाळा, जाणून घ्या कुठल्या दिशेने कुठले चित्र लावावे

Shravan 2021 : श्रावण महिन्यात भगवान शंकराची फोटो लावताना ‘हे’ नियम पाळा

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.