Shrawan Pradosh Vrat : या तारखेला आहे श्रावण महिन्यातला दुसरा प्रदोष व्रत, पाच शुभ योगात होणार साजरा
श्रावण महिन्याच्या दुसऱ्या प्रदोष दिवशी अनेक शुभ संयोग तयार होत आहेत. श्रावण प्रदोषाच्या दिवशी, शेवटचा श्रावण सोमवार, आयुष्मान योग, सौभाग्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग यांचा शुभ संयोग झाला आहे.

मुंबई : या वर्षी श्रावण महिन्यातील अधिक मासामुळे मागचा महिना विशेष ठरला. आता श्रावण महिना सुरू झाला आहे. 28 ऑगस्ट 2023 रोजी श्रावनातील दुसरा प्रदोष व्रत साजरा होत आहे. श्रावनातील सर्व प्रदोष व्रत विशेष आहेत, परंतु दुसरा प्रदोष (Shrawan Pradosh Vrat) काही कारणांमुळे आणखीनच विशेष आहे. श्रावणच्या प्रदोष व्रताच्या दिवशी 5 अत्यंत शुभ संयोग घडत आहेत. त्यामुळे हे प्रदोष व्रत पाळल्यास आणि नियमानुसार पूजा केल्यास अनेकविध फल प्राप्त होतील. विशेष म्हणजे हे प्रदोष व्रत सोमवारी पाळले जात आहे. अशाप्रकारे 28 ऑगस्ट 2023, सोमवारचे व्रत केल्यास प्रदोष व्रत आणि श्रावण सोमवार व्रत या दोन्हींचे फळ मिळेल.
श्रावण प्रदोषात शुभ योग
श्रावण महिन्याच्या दुसऱ्या प्रदोष दिवशी अनेक शुभ संयोग तयार होत आहेत. श्रावण प्रदोषाच्या दिवशी, शेवटचा श्रावण सोमवार, आयुष्मान योग, सौभाग्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग यांचा शुभ संयोग झाला आहे. सौभाग्य योगासारख्या शुभ योगात प्रदोषाच्या दिवशी शिवाची उपासना केल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते. तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रावणाच्या शेवटच्या प्रदोष आणि सोमवारी रुद्राभिषेक करणे फार फलदायी ठरेल.
श्रावण प्रदोष व्रत 2023 पूजेसाठी शुभ मुहूर्त
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही त्रयोदशी तिथींना पाळले जाते. हिंदी पंचांग नुसार, श्रावणाचा शेवटचा प्रदोष व्रत 28 ऑगस्ट 2023, सोमवारी साजरा केला जाईल. श्रावण शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी सोमवार 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06:48 पासून सुरू होईल आणि मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी दुपारी 02:47 पर्यंत चालेल. प्रदोष पूजेसाठी सूर्यास्तानंतरची वेळ महत्त्वाची असते. प्रदोष काळात प्रदोष व्रत पूजा करणे उत्तम मानले जाते. यावेळी प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 06:48 ते रात्री 9.2 पर्यंत असेल. अशाप्रकारे प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपूजनासाठी सुमारे अडीच तासांचा शुभ मुहूर्त उपलब्ध होईल. यावेळी उपासना केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
