AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sita Navami 2021 : सीता नवमी, जाणून घ्या देवी सीतेच्या जन्माची कथा

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला देवी सीता यांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवसाला सीता नवमी (Sita Navami 2021) किंवा जानकी नवमी म्हणून ओळखलं जातं.

Sita Navami 2021 : सीता नवमी, जाणून घ्या देवी सीतेच्या जन्माची कथा
sita navami
| Updated on: May 18, 2021 | 4:25 PM
Share

मुंबई : हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला देवी सीता यांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवसाला सीता नवमी (Sita Navami 2021) किंवा जानकी नवमी म्हणून ओळखलं जातं. यावेळी सीता नवमी 21 मे 2021 ला साजरी केली जाईल. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात. त्यासोबतच या दिवशी पूजा केल्याने घरात सुख-शांती राहाते. या विशेष दिवशी भगवान राम आणि देवी सीतेची पूजा केली जाते. जानकी जयंतीचा शुभ मुहूर्त आणि याच्या महत्वाबाबत जाणून घेऊ (Sita Navami 2021 Know The Story Behind Sita Birth And The Importance Of This Day) –

सीता नवमीचा शुभ मुहूर्त

सीता नवमीची सुरुवात – 20 मे 2021 रोजी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांपासून

सीता नवमी समाप्त – 21 मे रोजी 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत

सीता नवमीला अनेक शुभ योग बनत आहेत. मान्यता आहे की देवी सीता या देवी लक्ष्मीचा अवतार आहेत. देवी सीतेला पतीचे धैर्य आणि समर्पणासाठी ओळखलं जातं. त्यामुळे या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात. शास्त्रांनुसार, या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने तीर्थयात्रा आणि दान केल्याप्रमाणे फळ मिळतं.

सीता नवमीला उपवास कसा ठेवावा –

सकाळी-सकाळी उठून स्नान करा आणि उपवासाचे संकल्प घ्या

त्यानंतर घरातील मंदिरात विधीवत पूजा करा.

घरात गंगा जल असेल तर देवी- देवतांना स्नान करण्यासाठी घेतलेल्या पाण्यात थोडं गंगा जल मिसळा

त्यानंतर भगवान राम आणि देवी सीतेची पूजा करा.

सायंकाळी भगवान राम आणि देवी सीतेला नैवेद्य दाखवा

देवी सीतेची जन्म कथा –

वाल्मिकी रामायणानुसार, एकदा मिथिला येथे भीषण दुष्काळ पडला होता. त्यामुले राजा जनक खूप चिंतेत होते. तेव्हा या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी ऋषींनी यज्ञ करण्याची आणि जमीनिवर नांगर चालवण्याचा सल्ला दिला. ऋषींच्या आदेशानुसार, राजा जनकने यज्ञ केलं आणि जमीनिवर नांगर चालवू लागले आणि या दरम्यान त्यांना एक सुंदर कन्या मिळाली. राजा जनकला मूल नव्हतं आणि त्या कन्येला हातात उचलताच त्यांचा पिता प्रेमाचा अनुभव झाला. त्यांनी त्या कन्येचं नाव सीता नाव ठेवलं आणि आपल्या पुत्रीच्या रुपात तिला स्विकारलं.

Sita Navami 2021 Know The Story Behind Sita Birth And The Importance Of This Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ganga Saptami 2021 | कळत-नकळत घडलेल्या पापांतून मुक्ती आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गंगा सप्तमीला हे उपाय करा

Surdas Jayanti 2021 | ज्यांना स्वत: भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले, कोण होते सूरदास? जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.