Spiritual: आयुष्यात व्हायचे असेल यशस्वी तर रोज सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ एक काम

प्रत्येक यशस्वी व्यक्ती (successful in life) सकाळी लवकर उठण्याचा सल्ला देतात. सकाळी लवकर उठल्याने (waking up every morning) अधिकाधिक कामं मार्गी लावणे शक्य होते. शिवाय लवकर उठण्याचे बरेच वैज्ञानिक करणं आहेत. याशिवाय अध्यात्मातसुद्धा ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहेत. सकाळी उठल्याबरोबर देवाचे नाव घ्यावे. सूर्यदेवाचे दर्शन करावे यांनी आपला दिवस चांगला जातो शुभ बातमी […]

Spiritual: आयुष्यात व्हायचे असेल यशस्वी तर रोज सकाळी उठल्यानंतर करा 'हे' एक काम
नितीश गाडगे

|

Jul 04, 2022 | 9:25 AM

प्रत्येक यशस्वी व्यक्ती (successful in life) सकाळी लवकर उठण्याचा सल्ला देतात. सकाळी लवकर उठल्याने (waking up every morning) अधिकाधिक कामं मार्गी लावणे शक्य होते. शिवाय लवकर उठण्याचे बरेच वैज्ञानिक करणं आहेत. याशिवाय अध्यात्मातसुद्धा ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहेत. सकाळी उठल्याबरोबर देवाचे नाव घ्यावे. सूर्यदेवाचे दर्शन करावे यांनी आपला दिवस चांगला जातो शुभ बातमी आपल्या कानी पडतात.  सकाळी उठल्याबरोबर  सगळ्यात आधी सूर्याचे दर्शन केले तर तुमच्या दिवस अत्यंत शुभ  जाईल आणि शुभ बातम्या तुमच्या कानी पडतील. यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभेल. दिवसभरात कोणतेही काम हाती घ्याल ते काम पूर्ण होईल. तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. आंघोळ करून सूर्याचे दर्शन घेणे अधिक फलदायी ठरते. याशिवाय सूर्याला अर्घ्य दिल्याने अधिक लाभ मिळेल.

सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून जर आपण सगळ्यात आधी सूर्य देवाचे दर्शन घेतले तर आपल्या पत्रिकेतील अनिष्ठ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. आपले भविष्य बदलायला लागते. म्हणजे लगेच बदल होणार नाहीत पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये बदल व्हायला लागतो. आपल्या पत्रिकेत जो राजा असतो तो सूर्यदेव असतो. सगळ्या घडामोडी सूर्यामुळे होत असतात. सूर्याच्या दर्शनाने तुम्हाला नक्की फायदा होईल. हा उपाय सलग 21 दिवस करून पाहिल्यास याचा प्रभाव जाणवू लागेल. उत्तम आरोग्य, मानसिक स्थेर्य, आर्थिक समस्यांतून असे बरेच लाभ या उपायामुळे मिळतात. शिवाय सकाळी लवकर उठल्याने सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते. दिवसभराचे प्लॅनींग करून कामं मार्गी लावता येतात. आयुष्यात यशस्वी होणाऱ्या प्रत्येकानेच सकाळी लवकर उठण्याचे फायदे सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें