AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 7 May 2022 : घरातील वातावरण सुखाचे, निष्काळजीपणा तुमच्यासाठी त्रासदायक

आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया

Horoscope 7 May 2022 : घरातील वातावरण सुखाचे, निष्काळजीपणा तुमच्यासाठी त्रासदायक
| Edited By: | Updated on: May 07, 2022 | 6:15 AM
Share

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

तुळ –

दैनंदिन कामामुळे कंटाळले असल्याने आज वेळ मनोरंजन आणि विश्रांतीत जाईल. सामाजिक तसंच धार्मिक कामात वेळ घालविल्याने तुम्हाला आनंद आणि नवी उर्जा मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य परिणाम मिळतील. कुटूंबातील सदस्याच्या वैवाहिक जीवनात वितुष्टता येण्यासारखी परिस्थिती झाली आहे. ज्यामुळे घरातील वातावरण तणावाचे राहिल. पण, तुमचा सल्ला आणि सूचना बऱ्याच प्रमाणात परिस्थिती सुधरू शकतील. कामात आज जास्त वेळ देता येणार नाही. पण, फोन कॉल दुर्लिक्षित करू नका. त्याद्वारे तुम्हाला महत्वपूर्ण आर्डर मिळण्याची शक्यता आहे. पैश्याची देवाण घेवाण इत्यादी कार्य सावधानीपूर्वक करा.

लव फोकस – घरातील वातावरण सुखाचे राहिल. घरातील सर्वांना आपल्या जबाबदारींची जाणीव होईल.

खबरदारी – घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांच्यासाठी वेळ काढा.

शुभ रंग – क्रीम

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 8

वृश्चिक –

आज ग्रहमान तुमचे भाग्य अधिक प्रभावी बनवत आहे. त्याचा आदर करा आणि सदुपयोग करा.तुमच्या समजुतीने घर आणि व्यवसाय चांगले चालतील. महत्वपूर्ण यात्रेची शक्यता आहे. जुन्या नकारात्मक गोष्टी सोडून वर्तमानात लक्ष केंद्रित करा. त्यामुळे जवळची मैत्री खराब होऊ शकते. रागावर आणि तिखट जिभेवर नियंत्रण ठेवा. कंसल्टंसी तसंच पब्लिक डिलिंग संबंधित व्यवसाय आज खूप फायदात असतील. नवीन बिझनेस पार्टी तयार होतील. त्यामुळे लोकांच्या संपर्कात जास्तीत जास्त रहा. सरकारी सेवेतील लोकांना कोणत्यातरी कामानिमित्त लांबच्या प्रवासाचा योग आहे.

लव फोकस – वैवाहिक संबंध आनंदी राहतील. प्रेम संबंधात जवळीक निर्माण होईल.

खबरदारी – गर्मीच्या सिझनमुळे एलर्जी आणि सर्दी, खोकला होण्याची शक्यता. आयुर्वेदिक गोष्टीचे अधिक सेवन करा.

शुभ रंग – ऑरेंज

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 8

धनु –

आज कोणतंही काम करण्याआधी डोक्यापेक्षा मनाने जास्त विचार करा. तुमचं अंतरमन तुम्हाला योग्य विचार करण्याची क्षमता प्रदान करेल. घरात मंगल कार्य होण्याची शक्यता. कधीकधी तुमचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी त्रासदायक ठरतो. घरातील थोरामोठ्यांचे सल्ले दुर्लिक्षित करू नका. त्याचं सहकार्य आणि आशीर्वाद तुमच्यासाठी संजीवनीचं काम करेल. मशीनरी संबंधित व्यवसाय आज गती पकडतील. कामाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. असं केल्याने अधिक चांगले परिणाम मिळतील. नोकरदार व्यक्ति दिनचर्येमुळे कंटाळतील.

लव फोकस – नवरा बायकोच्या नात्यात सामंजस्य राहिल. विवाहबाह्य संबंध होण्याची शक्यता. त्यामुळे सावधान.

खबरदारी – खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. दिनक्रम व्यवस्थित ठेवा. पोटाचे तसेच लिव्हर संबंधित त्रास होऊ शकतात.

शुभ रंग – हिरवा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 3

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.