21 सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; काय असणार ग्रहणाची वेळ अन् 12 राशींवर परिणाम होणार का?
7 सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण झाले. तर आता 21 सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. काय असणार ग्रहणाची वेळ अन् सुतक काळ तसेच 12 राशींवर या सूर्यग्रहणाचा परिणाम होणार का? यासंबंधित माहिती जाणून घेऊयात.

सप्टेंबर महिना खूप खास मानला जात आहे. कारण एकीकडे हा महिना पितृपक्षापासून शारदीय नवरात्रीपर्यंत आहे, तर दुसरीकडे चंद्रग्रहणाव्यतिरिक्त या महिन्यात सूर्यग्रहणही होत आहे. अलिकडेच वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण झाले आहे. . भारतात हे चंद्रग्रहण दिसले, ज्यामुळे पुढील 6 महिन्यांसाठी 12 राशींच्या जीवनात निश्चितच काही प्रकारचा परिणाम दिसून येऊ शकतो. त्याच वेळी, वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण देखील या महिन्याच्या शेवटी होणार आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होणार आहे? ते भारतात दिसणार आहा का? तसेच त्याचा सुतक काळ काय असेल हे जाणून घेऊयात.
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी होईल?
पंचांगानुसार, वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला म्हणजेच रविवार, 21 सप्टेंबर 2025 रोजी होईल. हा दिवस सर्व पितृ अमावस्या देखील आहे. यासोबतच, दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्र सुरू होत आहेत.
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण किती वाजता होईल?
21 सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण रात्री 11 वाजता सुरू होईल आणि पहाटे 3 वाजून 23 मिनिटांपर्यंत चालेल.
भारतात सूर्यग्रहण दिसणार आहे का?
सप्टेंबर महिन्यातील दुसरे ग्रहण हे आंशिक सूर्यग्रहण आहे. तसेच, ते रात्रीच्या वेळी होत असल्याने, ते भारतात दिसणार नाही.
सूर्यग्रहण कुठे दिसेल?
जरी हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी ते दक्षिण प्रशांत महासागर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, दक्षिण महासागर, पॉलिनेशिया, मेलानेशिया, नॉरफोक बेट, आयलंड, क्राइस्टचर्च, वेलिंग्टन आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये दिसेल.
सूर्यग्रहणाचा सुतक काळ काय असेल?
जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा सुतक काळ त्याच्या 12 तास आधी सुरू होतो, जो ग्रहणानंतर संपतो. या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई असते. तसेच मंदिरांचे दरवाजे देखील बंद ठेवण्यास सांगितले जातात. याशिवाय गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पण हे आंशिक सूर्यग्रहण असल्याने ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक काळ देखील भारतात वैध राहणार नाही.
सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य कोणत्या राशीत असेल?
सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य कन्या आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असेल. अशा परिस्थितीत, 12 राशींच्या जीवनावर त्याचा काहीना काही परिणाम दिसून येऊ शकतो.
