मंगळाचा चंद्र हळूहळू मंगळाच्या दिशेने, चंद्र तुटून शनी सारखा होणार?; काय घडेल अवकाशात

सूर्याच्या समोरून फोबोसचा (Phobos)एक नितांत सुंदर फोटो कॅमेऱ्यात कैद केला आहे.

मंगळाचा चंद्र हळूहळू मंगळाच्या दिशेने, चंद्र तुटून शनी सारखा होणार?; काय घडेल अवकाशात
(Photo: Getty)
Image Credit source: (Photo: Getty)
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 03, 2022 | 7:00 PM

काही दिवसांपूर्वी नासाच्या (NASA) पर्सिवरेंस रोवर (Perseverance Rover) ने मंगळाच्या मागून (Mars) सूर्याच्या समोरून फोबोसचा (Phobos) एक नितांत सुंदर फोटो कॅमेऱ्यात कैद केला आहे. हे मंगळ ग्रहाचे ग्रहण होते. नासाने फोबोस बद्दल खूप महत्वाची माहिती दिलीय. नासाच्या माहितीनुसार, मंगळाची चंद्रमा फोबोस हा एक दिवस लाल ग्रहाला नक्की टक्कर देणार हे निश्चित आहे.

मंगळाचे दोन चंद्र आहेत – फोबोस (Phobos)आणि डीमोस (Deimos). फोबोस मंगळाच्या जवळ आहे. जो दिवसेंदिवस अधिक जवळ येत आहे. जसं की मंगळ कक्षा सोडे पर्यंत बाहेच्या बाजूने वाढेल.

नासाचे म्हणणे आहे की फोबोस दर शंभर वर्षांनी सहा फूट (1.8 मीटर) वेगाने मंगळाच्या जवळ जात आहे. या दराने, तो एकतर 50 दशलक्ष वर्षांत मंगळावर धडकेल. टक्करातून निघालेल्या अवशेषाचे मंगळाभोवती वलय होईल. हे शनीच्या कड्यांसारखे असू शकते. किंवा मंगळ किंवा गुरू यांच्यामध्ये अस्तित्वात आहे.

नासा ने नुकतंच Perseverance द्वारे घेतलेल्या ग्रहणाच्या फोटोवर चर्चा करताना सांगितले होते की, वैज्ञानिकांना आधीच माहिती आहे की मंगळाचा उपग्रह असलेला फोबस लवकरच नष्ट होणार आहे. चंद्रमा मंगळ ग्रहाच्या कक्षेत येतोय. येत्या काही वर्षात तो ग्रंहाना धडकणार आहे.

चंद्र दरवर्षी सुमारे 3.78 सेंटीमीटर (1.5 इंच) वेगाने पृथ्वीपासून दूर जातोय. याचा अर्थ भविष्यातील पिढी पूर्ण सूर्य ग्रहण (Total Solar Eclipse) पाहू शकणार नाही. कारण चंद्रमा दूर गेल्याने इतका लहान होईल की सूर्याला झाकू शकणार नाही.

नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे (NASA’s Goddard Space Flight Center) चे वैज्ञानिक रिचर्ड वोड्रंक (Richard Vondrak) 2017 मध्ये म्हणाले होते, काळा बरोबर पूर्ण सूर्य ग्रहणांची संख्या आणि आवृत्ती कमी होईल. आजपासून सुमारे 600 दशलक्ष वर्षांनंतर, पृथ्वी शेवटच्या वेळी संपूर्ण सूर्यग्रहणाचे सौंदर्य अनुभवेल

आकाशात सूर्य आणि चंद्राचा आकार अंदाजे सारखाच दिसतो, कारण सूर्य पृथ्वीपासून चंद्रापेक्षा 400 पट लांब आहे. व्यासाने अंदाजे 400 पट मोठा आहे. ४० दशलक्ष वर्षांपूर्वी, चंद्र त्याच्या सध्याच्या कक्षेत जाण्यापूर्वी, तो आताच्यापेक्षा जवळपास तिप्पट मोठा दिसत असे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें