वाईट काळ सुरू होण्यापूर्वी तुम्हाला मिळतात हे संकेत; वेळीच व्हा सावध
शकुन शास्त्राचा अभ्यास केला तरी देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज येऊ शकतो. आज आपण जाणून घेणार आहेत की एखाद्या व्यक्तीवर जर संकट येणार असेल तर त्याला कोणत्या प्रकारचे संकेत मिळतात?

सुख आणि दुख: हे दोन्ही जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी चांगले दिवस येतात. तर कधी वाईट दिवस देखील पाहावे लागतात. तुमच्या आयुष्यात काळ कोणताही असो, आनंदाचा किंवा दुख:चा तो फार काळ टिकत नाही. तुम्ही जर ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यात पुढे काय घटना घडणार आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो. ज्योतिषशास्त्राप्रमाणेच आणखी एक शास्त्र आहे, ज्याला आपण शकुन शास्त्र असे म्हणतो. शकुन शास्त्राचा अभ्यास केला तरी देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज येऊ शकतो. आज आपण जाणून घेणार आहेत की एखाद्या व्यक्तीवर जर संकट येणार असेल तर त्याला कोणत्या प्रकारचे संकेत मिळतात?
तुळशीचं रोप वाळणं – हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. असं म्हणतात की ज्या घरात तुळस आहे त्या घरावर मात लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. ज्या घरात तुळस असते त्या घरात सुख समृद्धी असते.मात्र जर तुमच्या घरातील तुळशीचं रोप अचानक वाळलं तर समजून घ्या की हे एक अशुभ लक्षण असून घरावर काही तर संकट येणार आहे.
घरात काळे उंदीर येणं – उंदरांना गणपती बाप्पाचं वाहन मानलं जातं, मात्र जर घरात काळे उंदीर दिसत असतील तर हे एक अशुभ लक्षण मानलं जातं, जर तुमच्याही घरात काळे उंदीर दिसत असतील तर हे एक वाईट वेळंचं लक्षण असू शकतं.
सोन्याची वस्तू हरवणं – सोन्याला माता लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार सोनं हरवणं अशुभ मानलं गेलं आहे. जर तुमच्याकडून सोनं हरवलं तर तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतं याचा तो संकेत असतो.
हातातून तूप सांडणं – जर तुमच्या हातातून तूप सांडलं तर ते देखील एक अशुभ लक्षण आहे, याचा अर्थ तुमचं काहीतरी आर्थिक नकुसान होऊ शकतं असा होतो. तसेच तुमचे तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत भांडणं देखील होऊ शकतात.
पालींची लढाई – जर तुमच्या घरात पालींची लढाई सुरू असेल तर तो देखील एक अशुभ संकेत आहे. पालींची लढाई म्हणजे तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडू शकतं असा त्याचा अर्थ होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
