Black Cat| काळ्या मांजरीला बघून तुमचा थरकाप उडतो ? पण या देशात लकी चार्म मानतात, जाणून घ्या

| Updated on: Dec 05, 2021 | 8:54 AM

प्रत्येक देश वेगळा त्याचप्रमाणे तिथल्या रुढी परंपरा वेगळ्या असतात. भारतात बहूतेक बऱ्याच भागात काळी मांजरील घेऊवून अनेक गोष्टी प्रचलित आहेत.

Black Cat| काळ्या मांजरीला बघून तुमचा थरकाप उडतो ? पण या देशात लकी चार्म मानतात, जाणून घ्या
black-cat
Follow us on

मुंबई : प्रत्येक देश वेगळा त्याचप्रमाणे तिथल्या रुढी परंपरा वेगळ्या असतात. भारतात बहूतेक बऱ्याच भागात काळी मांजरील घेऊवून अनेक गोष्टी प्रचलित आहेत. जर या मांजरीने तुमचा रस्ता ओलांडला तर मात्र तुमच्या सोबत नक्कीच काहीतरी वाईट होणार आहे असे म्हटले जाते. काळी मांजर नकारत्मकता आणि दुर्भाग्याचे प्रतीक मानली जाते. पण परदेशात मात्र या संकल्पना अतिशय विरुद्ध मानल्या जातात. तेथील संस्कृतीमध्ये काळ्या मांजरीला शुभ, प्रेमाचे प्रतिक मानले जाते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत ते देश.

1. युके (UK)

युके म्हणजेच ब्रिटनमध्ये नववधूला तिच्या लग्नाच्या पहिल्या दिवशी काळी मांजर भेट देण्याची प्रथा आहे. नवविवाहित जोडप्याच्या घरात मांजर असेल तर ते वाईट दूर करते अशी त्यामागिल मान्यता आहे. काळा हा रंग तेथे शुभ मानला जातो.

2. जपान (Japan)

जपानमध्ये, काळ्या किंवा पूर्णपणे पांढऱ्या मांजरी त्यांच्या घरात समृद्धी आणि सुख आणतात असे मानले जाते. जपानी लोकांच्या मते, काळ्या मांजरी वाईट गोष्टी दूर ठेवतात. त्याच प्रमाणे तुमचे भाग्य देखील बदलवतात.

3. फ्रान्स (France)

येथे काळ्या मांजरीला मैटागोट असे म्हणतात. जर तुम्ही काळ्या मांजरीला योग्य आहार दिलात किंवा तिच्या सोबत प्रेमाने वागलात तर ती मांजर तुम्हाला पैसा आणेल. त्याच प्रमाणे तुमचे भाग्य पूर्णपणे बदलून जाईल अशी मान्यता आहे.

4. स्कॉटलंड (scotland)

स्कॉटिश लोक मान्यतांवर खूप विश्वास ठेवतात. या लोकांच्या मते जर तुम्ही घरामध्ये काळी मांजर आणली तर त्या क्षणापासून तुमचे नशीब खूलते. तुम्हाला आयुष्यातील अनेक सुख मिळतात.

5. नॉर्वे (Norway)

नॉर्वे मधील पौराणिक कथामध्ये काळ्या मांजरी प्रेमाचे प्रतिक मानल्या आहेत. त्यांच्या मान्यतेनुसार काळ्या मांजरीने प्रेमाची फ्रीजा यांचा रथ ओढला होता. त्यामुळेच काळी मांजर या देशात खूप खास मानली जाते.

6. इजिप्त (Egypt)

इजिप्तमध्ये काळ्या मांजरींची देवता म्हणून पूजा केली जात असे. या देशात कुटुंबातील काळी मांजर मेली तर संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडते. त्या मांजरीच्या सर्व विधी हे लोक करतात.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)

संबंधित बातम्या

05 December 2021 Panchang : कसा असेल रविवारचा दिवस, ​​शुभ अशुभ मुहूर्त, पाहा काय सांगतेय पंचांग

Chandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल

Stranger Things | ऐकावे ते नवलच, इथे देवाला वाहिले जातात चक्क दगड, जाणून घ्या महाराष्ट्राच्या कुठल्या गावात आहे ही परंपरा