देशातील या मंदिरात 99 लाख 99 हजार 999 मूर्त्या, एक कोटीसाठी फक्त एकच मूर्ती कमी का?; काय कारण?

त्रिपुरातील उनाकोटी हे मंदिर आपल्या 99 लाख 99 हजार 999 दगडी मूर्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. या मूर्त्यांच्या निर्मितीचा काळ आणि हेतू आजही एक गूढ आहे. 'कोटीमध्ये एक कमी' या अर्थाचा उनाकोटी हा शब्द याच मूर्त्यांच्या संख्येवरून पडला आहे.

देशातील या मंदिरात 99 लाख 99 हजार 999 मूर्त्या, एक कोटीसाठी फक्त एकच मूर्ती कमी का?; काय कारण?
Mysterious Temple
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 31, 2025 | 6:09 PM

भारत हा अत्यंत अनोखा देश आहे. धार्मिकत्वाने भरलेला हा देश आहे. या देशात असंख्य मंदिर आहेत. जागोजागी देवळं आहेत. देशातील रहस्यमय मंदिरे आणि त्यांशी संबंधित कथा आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळतात, परंतु आज आम्ही ज्या मंदिराबाबत सांगणार आहोत ते अत्यंत खास आहे. हे मंदिर इतके गूढ आहे की त्याचं रहस्य आजवर उलगडलेलं नाही.

अत्यंत खास असं हे मंदिर आहे. या मंदिरात 99 लाख 99 हजार 999 मूर्त्या आहेत. आता तुम्ही म्हणाल हे मंदिर कुठे आहे? कोणते मंदिर आहे? आणि इतक्या मूर्त्यांचं रहस्य काय आहे? हे मंदिर त्रिपुरा राज्याची राजधानी अगरतळापासून सुमारे 145 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराचं नाव आहे ‘उनाकोटी’. या मंदिरात एकूण 99 लाख 99 हजार 999 दगडांच्या मूर्त्या आहेत, आणि त्यांचे रहस्य आजपर्यंत कोणालाही उलगडता आलेले नाही. उदाहरणार्थ, या मूर्त्या कोणत्या काळात आणि कोणत्या कारणासाठी बनविल्या, आणि त्यातले सर्वात मोठे गूढ म्हणजे एक कोटीमध्ये एक मूर्ती कमी का आहे? ‘उनाकोटी’ या नावाचा अर्थ ‘कोटीमध्ये एक कमी’ असा आहे, आणि याच मूर्त्यांच्या संख्येच्या कारणामुळे या स्थळाचे नाव ‘उनाकोटी’ पडले आहे.

मूर्त्या कशा झाल्या?

उनाकोटीला रहस्यमय स्थळ मानले जातं कारण हे एक पर्वतीय क्षेत्र आहे, ज्यात घनदाट जंगलं आणि दलदलीची क्षेत्रं आहेत. अशा परिस्थितीत जंगलाच्यामध्ये लाखो मूर्त्या कशा तयार केल्या गेल्या असाव्यात, कारण या कामात अनेक वर्षे लागू शकतात आणि त्या भागात तेव्हा कोणताही रहिवासी असावा असंही सांगितलं जातं. हा एक दीर्घकाळापासून संशोधनाचा विषय बनला आहे, परंतु अद्याप ठोस उत्तर मिळालं नाही.

एक कथा अशीही…

या मंदिरात दगडांवर उलगडलेल्या हिंदू देवी-देवतांच्या मूर्त्यांबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत. त्यापैकी एक कथा भगवान शिवाशी संबंधित आहे. कथेनुसार, एकदा भगवान शिव आणि एक कोटी देवी-देवता कुठेतरी जात होते. रात्र होऊ लागल्यावर इतर देवी-देवता महादेवाला उनाकोटीमध्ये विश्रांती घेण्यास सांगतात. महादेव मान्य करतात, पण ते ही सांगतात की सूर्य उगवण्यापूर्वी सर्व देवी-देवता इथून निघून जातील. परंतु, सूर्य उगवल्यावर फक्त भगवान शिवच जागे होते, आणि इतर सर्व देवी-देवता झोपले होते. हे पाहून भगवान शिव रागावले आणि त्यांनी सर्व देवतांना शाप दिला आणि त्यांना दगड बनवले. त्यामुळे येथे 99 लाख 99 हजार 999 मूर्त्या आहेत, म्हणजे एक कोटीपेक्षा एक कमी.

भोलेनाथांच्या शापाव्यतिरिक्त दुसरी एक कथा आहे. कथेनुसार, कालू नावाच्या शिल्पकाराला भगवान शिव आणि माता पार्वतीसह कैलाश पर्वतावर जायचं होतं. पण ते शक्य नव्हतं. मात्र शिल्पकाराच्या हट्टीपणामुळे भगवान शंकराने त्याला एक संधी दिली – “जर एक रात्रीत एक कोटी देवी-देवतेच्या मूर्त्या बनवल्या तर मी तुम्हाला माझ्यासोबत कैलाश पर्वतावर घेऊन जाईन.”, असं भगवान शंकर म्हणाले. हे ऐकून शिल्पकाराने रात्रीपासून मूर्त्या बनवायवा सुरुवात केली. रात्रभर त्याने मूर्त्या बनवल्या.

पण सकाळी गणती केल्यावर एक मूर्ती कमी असल्याचं लक्षात येतं. आणि म्हणूनच भगवान शिव त्याला आपल्या सोबत कैलाश पर्वतावर घेऊन जात नाहीत. मान्यतेनुसार, तेव्हाच या मंदिराची स्थापना झाली आणि हे मंदिर ‘उनाकोटी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. उनाकोटी मंदिर भारतातील सर्वात गूढ मंदिरांपैकी एक मानलं जातं, आणि ते त्रिपुरा राज्याच्या अगरतला शहरापासून 145 किलोमीटर दूर आहे.