AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaikuntha Ekadashi 2025 : वैकुंठ एकादशीच्या दिवशी ‘हे’ उपाय करा, घरात नांदेल सुख शांती…

Vaikuntha Ekadashi Upay: हिंदू धर्मात वैकुंठ एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. वैकुंठ एकादशीच्या दिवशी विष्णू देवाची पूजा केली जाते. या दिवशी विष्णूची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती नांदते. वैकुंठ एकादशीचे व्रत केल्यामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे. वैकुंठ एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यामुळे तुमच्यावर विष्णू देवाची कृपादृष्टी कायम राहाते.

Vaikuntha Ekadashi 2025 : वैकुंठ एकादशीच्या दिवशी 'हे' उपाय करा, घरात नांदेल सुख शांती...
| Edited By: | Updated on: Jan 07, 2025 | 10:34 PM
Share

हिंदू धर्मात वैकुंठ एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. वैकुंठ एकादशीच्या दिवशी विष्णू देवाची पूजा केली जाते. या दिवशी तुम्ही चांगल्या मनानी व्रत आणि विष्णू देवाची उपासना केल्यामुळे तुमच्यावर त्यांचे आशिर्वाद कायम राहाते. मान्यतेनुसार, वैकुंठ एकादशीचे व्रत केल्यामुळे तुमच्यावर विष्णू देवाची कृपादृष्टी कायम राहाते आणि मृत्यूनंतर तुम्हाला मोक्ष देखील मिळतो. वैकुंठ एकादशीचे व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होण्यास मदत आणि तुमचं मन शांत राहातं. वैकुंठ एकादशीच्या दिवशी विष्णू देवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील अडथळे कमी होते आणि तुम्हाला विशेष आशिर्वादाची प्राप्ती होते.

पंचांगानुसार, यंदाचा वैकुंठ एकादशीच्या व्रताला 9 जानेवारी रोजी दुपारी 12.22 पासून सुरुवात होईल ते 10 जानेवारी सकाळी 10.19 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार वैकुंठ एकादशीचे व्रत आणि पूजा 10 जानेवारी रोजी केली जाणार आहे. वैकुंठ एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी विष्णू देवाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती होतो. हा दिवस तुमच्या आयुष्यातील पापांचा नाश करून मन शुद्ध करण्याची उत्तम संधी आहे. या दिवशी व्रत केल्यास विष्णू देवाची कृपा होऊन जीवनात सुख-समृद्धी येते. वैकुंठ एकादशीचे व्रत करून लोक स्वर्गप्राप्तीचा मार्ग सुखाचा करू शकतात ज्यामुळे मृत्यूनंतर वैकुंठधाम प्राप्त होऊ शकते.

वैकुंठ एकादशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

वैकुंठ एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ झाडून आणि स्वच्छ लादी पून घ्यावी. त्यानंतर पूजेचे ठिकाण स्वच्छ करून फुलांनी आणि दिव्यांनी सजवावे. पूजा घरामध्ये विष्णू देवाची मूर्ती किंवा चित्र स्थापन करा. त्यानंतर विष्णूंना गंगाजलाने स्नान घाला आणि त्यांना फुले, चंदन, रोळी, सिंदूर इत्यादी अर्पण करा. त्यानंतर विष्णूच्या विविध मंत्रांचा जप करा आणि त्यावेळी विष्णू देवाला फळे, मिठाई किंवा इतर नैवेद्य अर्पण करा.

वैकुंठ एकादशीच्या दिवशी काय करावे?

  • वैकुंठ एकादशीच्या दिवशी दिवसभर निर्जल उपवास करा किंवा या दिवशी तुम्ही फळांचे सेवन करू शकता
  • वैकुंठ एकादशीच्या दिवशी गरिबांना दान केल्यामुळे तुम्हाला पुण्य मिळते
  • विष्णूची पूजा करताना “ओम नमो नारायणाय”, “ओम विष्णुवे नमः” या मंत्राचा जप करावा.

वैकुंठ एकादशीच्या दिवश या गोष्टी टाळा :

  • वैकुंठ एकादशीच्या दिवशी नकारात्मक विचारांपासून दूर राहा.
  • वैकुंठ एकादशीचे व्रत करताना खोटे बोलणे टाळा.
  • वैकुंठ एकादशीच्या दिवशी मांसाहाराचे सेवन टाळा.
  • वैकुंठ एकादशीला कांदा आणि लसूण खाऊ नये.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी