AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : धनप्राप्तीचे 4 सोपे उपाय, नशीबाचे दरवाजे उघडतील

अनेकदा असं घडतं की आपण प्रचंड कष्ट करतो, दिवस रात्र मेहनत करतो. परंतु आपल्या हातात पैसा टिकत नाही. त्यासाठी विविध कारणं कारणीभूत असू शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील तुम्हाला आर्थिक समस्या जाणवतात. आज आपण या समस्या दूर करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : धनप्राप्तीचे 4 सोपे उपाय, नशीबाचे दरवाजे उघडतील
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 02, 2026 | 8:54 PM
Share

अनेकदा असं होतं की आपण प्रचंड कष्ट करतो, दिवसरात्र मेहनत करतो, प्रचंड पैसा कमावतो, परंतु तो पैसा आपल्या हातात टिकत नाही. या पाठीमागे अनेक कारणं असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. यालाच आपण वास्तुदोष असं देखील म्हणतो. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा हळुहळु तिचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर होऊ लागतो, आणि तुमचं सगळं सुरळीत सुरू असताना देखील तुमच्यावर आर्थिक संकटं येण्यास सुरुवात होते. तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो हातात टिकत नाही. तसेच अनेकदा काहीही कारण नसताना देखील घरात भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. अशा प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मीठाचा उपाय – हा एक सोपा उपाय आहे, वास्तुशास्त्रानुसार जिथे स्वच्छता असते, त्या घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुम्ही तुमचं घर ओल्या पाण्याने पुसून काढा, घर पुसून काढत असताना त्यात थोडं मीठ किंवा हाळद टाका. हा उपाय एक महिनाभर नियमित केल्यामुळे हळद आणि मिठाच्या प्रभावामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुमची सर्व प्रकारची आर्थिक संकट देखील नष्ट होतात.

या उपायाप्रमाणेच आणखी एक दुसरा उपाय आहे, जर तुम्हाला तुमचं घर दररोज पुसायला जमत नसेल तर एका भांड्यात थोडं पाणी घ्या, त्यामध्ये मीठ आणि हळद टाका, या पाण्याने तुमच्या घराचा उंबरा पुसून घ्या, हा उपाय दररोज केल्यास बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत नाही.

अंघोळीच्या पाण्यात मीठ – अंघोळ करताना त्या पाण्यात किंचित सैंधव मीठ टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा, त्यामुळे तुम्हाला जर कोणाची वाईट नजर लागली असेल आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक संकट येत असतील तर ते दूर होतील असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

घराची उत्तर दिशा – घराची उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची असते, त्यामुळे ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी, तसेच उत्तर दिशेच्या भिंतीला कुबेराचा फोटो लावावा, तसेच तुमच्या देवघरात एक लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा, आणि नियमित सकाळी तिची पूजा करावी, लक्ष्मी मातेच्या कृपेनं तुमच्या आयुष्यात येणारी सर्व आर्थिक संकट दूर होतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा