Vastu Shastra : पती-पत्नीचं पटत नाही? प्रेमात दुरावा आलाय? मग हे उपाय नक्की करा
अनेकदा असं होतं की, काही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं होण्यास सुरुवात होते, याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर परिस्थिती घटस्फोटापर्यंत देखील जाऊ शकते, जर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, जे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन ऊर्जेच्या आधारावर काम करतं. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्या ऊर्जेचा परिणाम हा तुमच्यासोबतच तुमच्या संपूर्ण कुटुंबांवर होत असतो. नकारात्मक ऊर्जेमुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होणं, विनाकारण पती-पत्नीमध्ये वाद होणं. प्रेमामध्ये दुरावा, अशा अनेक घटना घडू शकतात. तर सकारात्मक ऊर्जेमुळे घरातील वातावरणं आनंदी राहतं. तुम्हाला प्रगतीच्या नवीन संधी मिळतात. पती-पत्नीमध्ये देखील प्रेम वाढतं. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
अनेकदा काही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं होण्यास सुरुवात होते, जर एखाद्या दुसऱ्यावेळी असे वाद होत असतील तर ही सामान्य बाब आहे, मात्र जर पती-पत्नीमध्ये दररोज काही कारण नसताना भांडणं होत असतील तर ही गोष्ट गांभीर्यानं घेतली पाहिजे, कारण अशा स्थितीमध्ये प्रकरण घटस्फोटापर्यंत देखील पोहोचू शकतं. जर पती-पत्नीमध्ये वाद वाढले असतील, पती-पत्नीचं आपसात पटत नसेल तर यामागे वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो, अशावेळी नेमकं काय करावं हे वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
बेडरूमची रचना – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडरूमची रचना कशी आहे, याचा देखील तुमच्या आयुष्यावर खूप परिणाम होत असतो, वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडरूममधील पंखा हा कधीही तुमच्या बेडच्या मध्यभागी नसावा. तसेच बेडरूमच्या भिंतींसाठी कधीही भडक रंगाचा वापर करू नये, तर बेडरूमच्या भिंतीला नेहमी लाईट कलर असावा. तुमच्या बेडरूमच्या मधून बीम गेलेला नसावा, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.
फोटो – तुमच्या बेडरूममध्ये कधीही वाहत्या पाण्याचे जसं की वाहाती नदी, वाहाता झरा याचे फोटो किंवा तसे निसर्ग चित्र नसावेत, त्याऐवजी तुम्ही राधा कृष्ण यांचा फोटो लावू शकता, पण लक्षात ठेवा राधा कृष्ण यांचा फोटो हा नेहमी जोडीनेच असावा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
