Vastu Shastra: स्वयंपाक घरात चुकूनही या वस्तू उलट्या ठेवू नका, नाहीतर होतील रोज भांडणं
वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? यासंदर्भात तर मार्गदर्शन करण्यात आलंच आहे, मात्र सोबतच जर तुमच्या घरामध्ये काही समस्या निर्माण होत असतील, घरात अशांतता असेल, पैसा टिकत नसेल तर अशा समस्यांवर देखील उपाय सांगण्यात आले आहेत.

तुमचं स्वयंपाक घर हे फक्त एक जेवण तयार करण्याचं ठिकाण नाहीये, तर वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाक घर हे सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. असं म्हणतात ज्या प्रकारचं अन्न आपण खातो त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर आणि विचारांवर होत असतो. त्यामुळे तुमच्या स्वयंपाक घरात जर नकारात्मक ऊर्जेनं प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या आरोग्यावर होतो, त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होतो, वादविवाद होतात. त्यामुळे स्वयंपाक घरात निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होऊ नये, यासाठी स्वयंपाक घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्याचा आपला प्रयत्न असतो.
मात्र अनेकदा नकळत आपण अशा काही छोट्या -छोट्या चुका करतो ज्याचा परिणाम हा तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होतो. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या स्वयंपाक घरात चुकूनही उलट्या ठेवल्या नाही पाहिजेत, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे तुमच्या घरात छोट्या -छोट्या गोष्टींवरून वाद होतात. चालू कामांमध्ये अडथळे निर्माण होतात, आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होतात, चला तर मग जाणून घेऊयात, स्वयंपाक घरात कोणत्या वस्तू या उलट्या ठेवल्या नाही पाहिजेत.
स्वयंपाक घरातील भांडी – अनेक लोक साफसफाईच्या नादात स्वयंपाक घरातील भांडी उलटी ठेवतात. जसे की जेवणाचं ताट, तवा या सारखी भांडी. परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरातील ही भांडी उलटी ठेवणं चुकीचं आहे. कारण यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, ज्याचा परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि आरोग्यावर होऊ शकतो.
झाडू – तुमच्या घरातील झाडूला माता लक्ष्मीचं प्रतिक माण्यात आलं आहे. तुम्हाला देखील झाडू उलटा ठेवण्याची सवय असेल तर हे धर्मशास्त्रानुसार चुकीचं आहे. यामुळे घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मोठ्या प्रमाणात धन हानी होते. अचानक येणाऱ्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे झाडू कधीच उलटा ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं.
चाकू आणि कात्री – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या स्वयंपाक घरामध्ये असलेला चाकू आणि कात्री कधीही उलटी ठेवू नका, चाकू आणि कात्री उलटी ठेवल्यास घरात छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण होतात, घरात शांतता टीकत नाही, प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
फ्रीजमध्ये पाण्याची बाटली – फ्रीजमध्ये पाण्याची बाटली ठेवताना ती नेहमी सोईची ठेवावी, उलटी ठेवू नये, फ्रीजमध्ये पाण्याची बाटली उलटी ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्याचा परिणाम हा तुमच्या आर्थिक प्रगतीवर होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.
