Vastu Shastra : घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही लावू नका ही झाडं, …तर तिजोरी खाली झालीच म्हणून समजा
वास्तुशास्त्रामध्ये झाडांना देखील विशेष महत्त्व आहे, काही झाडं हे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानली गेली आहेत, तर काही झाडं ही अशुभ मानली गेली आहेत, मात्र वास्तुशास्त्रात जी झाडं शुभ मानण्यात आली आहेत, त्या झाडाची दिशा चुकल्यास त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही शुभ मानण्यात आली आहे, अशी झाडं घरात लवल्यामुळे घरात सुख, शांती येते, समृद्धी येते. घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते, असं वास्तुशास्त्र सांगतं. मात्र अशी देखील काही झाडं आहेत, जी वास्तुशास्त्रानुसार अशुभ असतात. अशी झाडं घरात लावल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, असं वास्तुशास्त्र सांगतं. परंतु अनेकदा असं देखील होतं की आपण वास्तुशास्त्रानुसार जी झाडं शुभ मानण्यात आली आहेत, ती घरात लावतो. मात्र त्याचा परिणाम हा उलटा होतो, घरात आर्थिक प्रश्न निर्माण होतात. काही कारण नसताना वाद वाढतात, असं का होतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण शुभ समजली जाणारी झाडं ही चुकीच्या दिशेला विशेष: दक्षिण दिशेला लावतो, त्यावेळी अशाप्रकारच्या समस्या निर्माण होतात. ही झाडं नेमकी कोणती आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
तुळस – हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तुळस ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं सर्वात प्रिय झाडं आहे. मात्र तुळस ही दक्षिण दिशेला चुकूनही लावू नये कारण दक्षिण दिशा ही पित्र आणि यमाची दिशा असते, त्यामुळे जेव्हा तुम्ही तुळस ही दक्षिण दिशेला लावता तेव्हा सकारात्मक प्रभाव पडत नाही, उलट तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होतात, घरात कलह वाढतो.
मनी प्लांट- मनी प्लांटला पैशांचं झाडं असं देखील म्हणतात, हा वेल घरात लावणं शुभ मानलं जातं, यामुळे घराकडे पैसा आकर्षित होतो, असं मानलं जातं, मात्र जेव्हा तुम्ही हा वेल दक्षिण दिशेला लावता तेव्हा त्याचा विपरीत परिणाम होतो, घरात पैसा ऐन्याऐवजी तुमच्या खर्चात वाढ होते.
शमीचं झाड – शमीच्या झाडाला देखील धार्मिक महत्त्व आहे, शमीचं झाडं हे चुकूनही दक्षिण दिशेला लावू नये, त्यामुळे तुमच्या घरात अडचणी निर्माण होऊ शकतात.
केळी – केळीचं झाडं हे भगवान विष्णू यांचं प्रिय झाड आहे, या झाडाची दर गुरुवारी पूजा केल्यास विष्णू देवता प्रसन्न होतात असं मानलं जातं. मात्र हे झाड दक्षिण दिशेला लावू नये, त्याऐवजी इतर कोणत्याही दिशेला लावलं तर चालू शकतं.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
