Vastu Shastra : हातात आलेला पैसा लगेच खर्च होतोय? मग घरात करा फक्त हे 3 सोपे बदल, आयुष्यात पैशांची कमी भासणार नाही
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचं आपलं एक वेगळं महत्त्व असतं, जर घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवल्या गेल्या तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते, घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. आज आपण अशाच काही दिशांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांचा संबंध हा पैशांशी असतो.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे, सोबतच आपण काही छोट्या-छोट्या चुका देखील करत असतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोषामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुम्हाला अपेक्षित यश मिळत नाही, कार्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात, हातात पैसा टिकत नाही, तर हा वास्तुदोष कसा दूर करायचा? याबद्दल देखील वास्तुशास्त्रामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचं आपलं एक वेगळं महत्त्व असतं, जसं की उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते, पश्चिम दिशा ही शनिची दिशा असते, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिशेचं एक वेगळं स्थान आहे, हे लक्षात घेऊन काही छोटे-छोटे उपाय केल्यास तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता जाणवणार नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
घराची उत्तर दिशा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते, त्यामुळे या दिशेला कधीही लोखंडी सामान, भंगार सामान आणि घरातील टाकावू वस्तू ठेवू नयेत, अन्यथा घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि हातात पैसा टिकत नाही, घराची उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवावी, ज्यामुळे कुबेरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि घराला बरकत येते, हातात पैसा टिकून राहतो.
पैशाची तिजोरी – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील तिजोरीचं तोंड हे नेहमी उत्तर दिशेला असावं, कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते, जर तुमच्या घरातील तिजोरीचं तोंड हे उत्तर दिशेला असेल तर तुम्हाला आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. तुमची तिजोरी नेहमी धनानं भरेली राहते. तसेच उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावणं देखील शुभ मानलं जातं.
अग्नेय दिशा – घराची अग्नेय कोण जो असतो तो अत्यंत पवित्र मानला जातो. ही दिशा अग्नी देवाची दिशा मानली जाती. त्यामुळे आपलं किचन हे नेहमी अग्नेय दिशेलाच असावं. यामुळे घरात बरकत येते, कधीही अन्न-धान्याची कमी जाणवत नाही, आरोग्यही उत्तम राहते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
