Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? मग पाण्यात या 5 गोष्टी मिसळून करा अंघोळ, सर्व समस्या होतील दूर
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या दैनंदिन आयुष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवर धार्मिक आधारांवर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकांना आर्थिक समस्या असते, ती दूर करण्यासाठीचा सोपा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडी अडचणींवर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्या आयुष्यात सर्वात मोठी कोणती समस्या असते तर ती म्हणजे आर्थिक समस्या. आपल्याला अनेकदा आर्थिक अडचण जाणवते, कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही. अनेकदा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे येतात, मात्र ते लगेचच कोणत्या न कोणत्या कामासाठी खर्च होतात. हातात पैसा न टिकण्यासाठी अनेक कारणं असू शकतात. मात्र हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष तयार होतो, तेव्हा देखील तुम्हाला अशा प्रकारच्या समस्या जाणवू लागतात. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्याही घरात पैसा टिकत नसेल तर असे काही पदार्थ आहेत, जे तुम्ही पाण्यात मिसळून त्याने अंघोळ केल्यास तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील, तसेच तुमच्या पैशांशी संबंधित समस्या देखील दूर होण्यास मदत हेईल, जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल.
सैंधव मीठ – घरातील नकरात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं महत्त्वाचं साधन म्हणून सैंधव मिठाकडे पाहिलं जातं. दररोज थोडं सैंधव मीठ अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्यानं अंघोळ केल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंपासून तुमचं संरक्षण होतं. आर्थिक समस्या दूर होतात.
तेजपत्ता – तेजपत्ता ही केवळ एक मसाल्याची वस्तूच नाहीये तर वास्तुशास्त्रामध्ये देखील त्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. अंघोळीच्या पाण्यात थोडासा तेज पत्ता टाकून त्या पाण्यानं अंघोळ केल्यास सर्व निगेटिव्हीटी दूर होते. तसेच त्यामुळे घरात आर्थिक बरकत येते असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
लवंग – लवंगांचे अनेक आयुर्वेदिक उपयोग आहेत, मात्र त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये देखील अनेक फायदे सांगण्यात आले आहेत, अंघोळीच्या पाण्यात दररोज एक लवंग टाकून त्याने अंघोळ केल्यास त्यामुळे अनेक लाभ मिळतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
