AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाहीये? व्यवसायात अडथळे येतायेत? मग करा तुरटीचे हे खास उपाय

अनेकांसोबत असं होतं की ते प्रचंड पैसे कमवतात परंतु त्याच्या हातात पैसा टिकत नाही, व्यावसायामध्ये देखील अनेक अडचणी येतात. यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे घर तसेच तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असलेली सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळते.

Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाहीये? व्यवसायात अडथळे येतायेत? मग करा तुरटीचे हे खास उपाय
alumImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 04, 2026 | 10:08 PM
Share

अनेकांसोबत असं होतं की ते आपल्या आयुष्यात खूप पैसे कमावतात, पैसे कमावण्यासाठी ते दिवसरात्र कष्ट करतात. मात्र त्यांच्या हातात कधीच पैसा टिकत नाही. जसा महिन्याच्या सुरुवातीला पैसा येतो, तसाच तो महिन्याच्या शेवटी संपून जातो. माणूस सतत याच चक्रात गुंतून जातो. हातात पैसा आल्यानंतर काही न काही असे अकस्मात खर्च समोर येतात, ज्यामुळे पैसा तुमच्या हातात टिकू शकत नाही. तसेच काही लोकांना असा देखील अनुभव येतो की इच्छा नसताना देखील त्यांच्या अनावश्यक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे त्यांच्याकडे असलेला पैसा खर्च होऊन जातो. अनेकजण अशा खर्चांना आळा घालण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. यामागचं सर्वात मोठं कारण असतं ते म्हणजे तुमच्या घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा. या नकारात्मक ऊर्जेला दूर करण्याचे वास्तुशास्त्रात अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

तुरटीचे उपाय

तुरटी एक स्फटिक असतं. आयुर्वेदामध्ये देखील तुरटीचे अनेक उपयोग सांगण्यात आले आहेत. पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील तुरटीचा वापर होतो. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात देखील तुरटीचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य लाभतं. जर तुमच्या हातात आलेला पैसा टिकत नसेल. अनावश्यक खर्चामध्ये मोठी वाढ झाली असेल, इच्छा असूनही तुम्ही तुमचा अनावश्यक खर्च कमी करू शकत नसाल तर यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तुरटीचे दोन ते तीन खडे घ्या, ते एका लाल कापडामध्ये गुंडाळा आणि ही पोटली तुमच्या घराच्या किंवा व्यावसायाच्या ठिकाणी मुख्य दरवाजाच्या बाहेर बांधा, या सोप्या उपायामुळे पैशांची बचत होईल, तुमच्या हातात आलेला पैसा टिकून राहील आणि तुमची तिजोरी सदैव धनाने भरलेली राहील असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

नकारात्मक शक्तींपासून बचाव

वास्तुशास्त्रानुसार तुरटी तुमचा नकारात्मक शक्तींपासून बचाव करू शकते. जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती असेल तर अशावेळी त्याचा त्रास तुम्हाला होतो. घरात काहीही कारण नसताना वाद विवाद होतात, भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. अशावेळी तुरटीचा एक तुकडा सदैव आपल्या घरात ठेवावा, यामुळे घरातील नकरात्मक शक्ती कमी होते. तसेच तुम्ही जर नवी कार घेतली असेल किंवा कोणतंही वाहन घेतलं असेल तर त्यामध्ये तुरटीचा एक तुकडा आवश्य ठेवावा यामुळे तुमच्या प्रगतीला कोणाचीही वाईट नजर लागत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान