Vastu Shastra : घरात कालिका मातेची मूर्ती असावी की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार अशा काही मूर्ती असतात ज्या मूर्ती घरात नसाव्यात असं म्हटलं जातं, यामागे विविध कारणं असतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत, घरात देवी कालिका मातेची मूर्ती असावी की नाही? यासदंर्भात वास्तुशास्त्रात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

वास्तुशास्त्रानुसार अशा काही मूर्ती किंवा प्रतिमा असतात, ज्या घरात असणं शुभ मानलं जात नाही. कारण अशा प्रतिमांमुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो. जसं की वास्तुशास्त्रानुसार घरात वाहत्या पाण्याची प्रतिमा किंवा फोटो असू नये, यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो, त्याचा परिणाम थेट तुमच्या आर्थिक गोष्टींवर होतो. तुमच्या हातात पैसा टिकत नाही.अशाच इतरही अनेक प्रतिमा आहेत. काही प्रतिमा या अशा असतात की त्या घरात असणं शुभ मानलं जातं, मात्र त्या योग्य दिशेलाच ठेवल्या गेल्या पाहिजेत. तरच त्याचं शुभ फळ आपल्याला मिळतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. दरम्यान काही प्रतिमा अशा असतात ज्या देवी-देवतांच्याच असतात, मात्र त्या घरात नसाव्यात असं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तुमच्या घरात देवी -देवतांच्या प्रतिमा लावल्या तर त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, आणि घरातील वातावरण आनंदी राहतं. परंतु याला काही प्रतिमा या अपवाद आहेत.
जसं की तुमच्या देवघरात शिवलिंग असणं हे अतिशय शुभ मानलं जातं. दररोज सकाळी महादेवांची पूजा करण्याचा सल्ला वास्तूशास्त्रात देण्यात आला आहे. मात्र महादेवांचं एक रूप असलेल्या नटराज यांची मूर्ती घरात ठेवू नये असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. त्यामुळे घरात काहीही कारण नसताना भांडणं होऊ शकतात. तसेच घरात उजव्या सोंडेचा गणपती देखील नसावा असं वास्तुशास्त्र सांगतं, त्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे घरात उजव्या सोंडेचा गणपती असणं हे अतिशय शुभ आहे, परंतु त्याचं सोवळं हे खूप कडक असतं, जर सर्व नियम पाळले गेले नाहीत तर त्याचा तुमच्या घरावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे घरात नेहमी डाव्या सोंडेचाच गणपती असावा असं वास्तुशास्त्र सांगतं. दरम्यान आज आपण अशाच एका मूर्तीबद्दल माहिती घेणार आहोत, ती म्हणजे देवी कालिका मातेची मूर्ती घरात असावी की नाही? याबद्दल.
कालिका मातेची मूर्ती घरात असावी की नाही?
वास्तुशास्त्रानुसार घरात देवी कालिका मातेची मूर्ती असू नये, कालिका मातेची पूजा ही नेहमी मंदिरात जाऊनच करावी. जर घरात कालिका मातेची मूर्ती असेल तर त्याचा परिणाम हा कुटुंबावर होतो, घरात कलह वाढू शकतो. कालिका मातेऐवजी तुम्ही तुमच्या देवघरात देवी दुर्गा मातेची मूर्ती ठेवू शकता, कारण कालिका माता हे देवी दुर्गा मातेचच रूप आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
