AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : तुमच्याही घरात रोज भांडणं होतात? मग हे झाडं घरात ठेवूच नका, वास्तुशास्त्र काय सांगतं?

तुमच्याही घरात जर नेहमी भांडण होत असतील तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगतिलेला हा सोपा उपाय करून पाहू शकता, यामुळे तुमच्या घरातील वाद मिटण्यास मदत होऊ शकते.

Vastu Tips : तुमच्याही घरात रोज भांडणं होतात? मग हे झाडं घरात ठेवूच नका, वास्तुशास्त्र काय सांगतं?
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 05, 2025 | 4:18 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. तुमच्या घराची रचना कशी असावी? या बाबतचे नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. जर तुमच्या वास्तुची रचना ही योग्य नसेल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागू शकतो, असं वास्तुशास्त्र सांगते. यामध्ये आर्थिक, आरोग्यविषयक अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, त्याचे परिणाम दीर्घकाळ राहातात असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे, असे लोक घर खरेदी करताना नेहमी वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुतज्ज्ञांचं मत विचारात घेऊनच घराची खरेदी करतात किंवा बांधकाम करतात.

वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराची दिशा कोणती असावी? तुमच्या घराचं मुख्य प्रवेश द्वार कोणत्या दिशेला असावं? स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? बेडरूम कोणत्या दिशेला असू नये? अशा अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू ठेवता, त्या वस्तुंची दिशा देखील योग्य असायला हवी असं वास्तुशास्त्र सांगतं. घरात कोणत्या वस्तू असाव्यात? कोणत्या वस्तू असू नयेत? वस्तूंची दिशा कोणती असावी? अशा एकना अनेक विषयांवर वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

एवढंच नाही तर तुमच्या घरात काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती असू नये, त्याचे परिणाम अशुभ असतात असं देखील वास्तुशास्त्र सांगतं, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये काटेरी वनस्पती असता कामा नये, जसं निवडूंग वगैरे, कारण या वनस्पतींचा गुणधर्मच असा असतो, की त्यामुळे घरातील शांतता भंग पावते, घरात नेहमी वादविवाद कलह होतात, भांडण होतात. त्यामुळे या वनस्पती घरात न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, याला फक्त एकच झाडं अपवाद आहे ते म्हणजे गुलाबाचं, गुलाबाच्या झाडाला जरी काटे असले तरी देखील अशुभ मानलं जातं नाही. मात्र जर तुमच्या घरात काटे असलेली इतर कोणतीही वनस्पती असेल तर ती घरात न ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आलेला आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...