Vastu Tips : चुकूनही या 5 गोष्टी बाथरूममध्ये ठेऊ नका; नाहीतर व्हाल कंगाल, वास्तुशास्त्र काय सांगतं?
तुमच्या घरात असलेलं बाथरूम ज्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही, मात्र वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही चुकीच्या गोष्टी बाथरूममध्ये ठेवल्या तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

वास्तुशास्त्र हे फक्त घराच्या बांधकामाशीच संबंधित नाही तर त्याचा परिणाम हा तुमचे विचार, तुमचं आरोग्य, तुमचं जीवन यावर देखील होतो अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील प्रत्येक वस्तू ही योग्य जागी आणि योग्य दिशेला ठेवणं गरजेच आहे, त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी येते, तुमच्यावर कोणतंही आर्थिक संकट येत नाही. मात्र जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल, तुम्ही तुमच्या घरातील वस्तू या वास्तुशास्त्रानुसार ठेवलेल्या नसतील तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
तुमच्या घरात असलेलं बाथरूम ज्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही, मात्र वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही चुकीच्या गोष्टी बाथरूममध्ये ठेवल्या तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, घरात वादविवाद वाढू शकतात, अनेक नकारात्मक गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळू शकतात. कोणत्या गोष्टी बाथरूममध्ये ठेवणं अशुभ आहे त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
फाटलेली चप्पल – जर तुमची चप्पल खराब झाली असेल, ती घालण्यायोग्य नसेल तर अशी चप्पल बाथरूममध्ये ठेवू नका, असं वास्तुशास्त्र सांगतं, ज्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
झाडांची रोपं ठेवणं – अनेक लोक बाथरूममध्ये सुशोभिकरणासाठी झाडांची रोपं ठेवतात, मात्र असं न करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो. यामुळे तुमच्या घरात आर्थिक संकट येऊ शकतं.
ओले कपडे ठेवू नका – अनेक जण ओले कपडे बाथरूममध्ये ठेवण्याची चूक करतात, मात्र वास्तुशास्त्रामध्ये याला अशुभ मानलं गेलं आहे. त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
बाथरूममध्ये मोकळी बादली ठेवू नका – वास्तुशास्त्रानुसार असं केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनावर होतो. घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.
वास्तुशास्त्रानुसार फुटलेला आरसा देखील बाथरूममध्ये न ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
