AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाळलेली तुळस अशुभ म्हणून फेकून देण्याची चूक करु नका, फक्त हे उपाय करा, नशिबाचे दार आपोआप उघडेल

उन्हामुळे तुमची तुळस सुकली आहे का? वाळलेली तुळस फेकून न देता करा हे ३ सोपे वास्तु उपाय, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येईल आणि आर्थिक समस्या दूर होतील.

वाळलेली तुळस अशुभ म्हणून फेकून देण्याची चूक करु नका, फक्त हे उपाय करा, नशिबाचे दार आपोआप उघडेल
tulsi-1
| Updated on: Apr 24, 2026 | 3:08 PM
Share

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. राज्यात एकीकडे तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने निसर्गासह मानवी जीवनावरही त्याचे परिणाम होताना दिसत आहे. या कडक उन्हाचा फटका आपल्या अंगणातील तुळशीलाही बसतो. योग्य काळजी घेऊनही अनेकदा तीव्र उष्णतेमुळे तुळस सुकते किंवा कोमेजते. हिंदू धर्मात तुळस वाळणे अशुभ मानले जात असले, तरी वास्तुशास्त्रानुसार वाळलेल्या तुळशीचा वापर करून आपण जीवनातील अनेक संकटांवर मात करू शकतो.

जर तुमची तुळस वाळली असेल, तर निराश होऊन ती फेकून देऊ नका. वाळलेल्या तुळशीच्या लाकडात आणि पानांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा साठा असतो, जो तुमच्या घरातील वास्तुदोष आणि आर्थिक समस्या दूर करण्यास मदत करतो.

घराला दृष्ट लागण्यापासून वाचवते

अनेकदा घरात विनाकारण भांडणे होतात किंवा घरातील सदस्यांना सतत नैराश्य जाणवते. अशा वेळी वाळलेल्या तुळशीच्या लाकडाचा एक लहान तुकडा घ्यावा. तो स्वच्छ लाल कापडात गुंडाळून त्याला पवित्र धाग्याने बांधावे. हे गाठोडे घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर वरच्या बाजूला मध्यभागी टांगावे. वास्तुशास्त्रानुसार, हा उपाय घराचे नकारात्मक शक्तींपासून रक्षण करतो. तसेच घराभोवती संरक्षक कवच निर्माण करतो.

आर्थिक चणचण दूर करते

जर तुम्ही कठोर परिश्रम करत असाल, पण तरीही पैशांची बचत होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल, तर हा उपाय करावा. वाळलेल्या तुळशीच्या झाडाचे मूळ किंवा फांदीचा एक छोटा तुकडा घ्यावा. तो गंगाजलाने स्वच्छ धुवून शुद्ध करावा. त्यानंतर एका पिवळ्या कापडात तो तुकडा ठेवून त्याची छोटी पोटली बनवावी आणि तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवावी. यामुळे धनाची आवक वाढते आणि विनाकारण होणारे खर्च थांबतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

प्रलंबित कामांसाठी खास

भगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीला सर्वोच्च स्थान आहे. जर तुमची अनेक कामे बराच काळ रेंगाळली असतील, तर कोणत्याही एकादशीला किंवा गुरुवारी संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. या दिव्यात वाळलेल्या तुळशीचा एक छोटा तुकडा टाकावा. याला ‘तुळशी काष्ठ दीप’ म्हणतात. हा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. तसेच अडकलेली कामे पूर्ण होण्यास मार्ग मोकळा होतो.

हे आवर्जून लक्षात ठेवा

  • तुळस ही अत्यंत पूजनीय आहे, त्यामुळे तिचे अस्तित्व संपल्यानंतरही तिचा अपमान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे:
  • वाळलेल्या तुळशीला कधीही अस्वच्छ किंवा घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नका.
  • तुळशीचे लाकूड कधीही कचऱ्याच्या डब्यात किंवा गटारात फेकू नका. यामुळे मोठे दोष लागू शकतात.
  • वापर करून उरलेले तुळशीचे अवशेष झाडाच्या कुंडीत मातीखाली गाडावेत किंवा वाहत्या पवित्र पाण्यात विसर्जित करावेत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत