AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमावलेला पैसा हातात टिकत नाही? तुमच्या घरातली एक चूक ठरते कारणीभूत

घरातील पायऱ्यांवर बसण्याची सवय तुम्हाला महागात पडू शकते. वास्तुशास्त्रानुसार पायऱ्यांवर बसल्याने आर्थिक प्रगतीत कसे अडथळे येतात आणि कौटुंबिक शांतता कशी भंग होते, याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

कमावलेला पैसा हातात टिकत नाही? तुमच्या घरातली एक चूक ठरते कारणीभूत
money
| Updated on: May 18, 2026 | 3:12 PM
Share

ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीचा आणि जागेचा तिथल्या सदस्यांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. अनेकदा लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या किंवा स्वयंपाकघराच्या वास्तूवर विशेष लक्ष देतात, परंतु जिना म्हणजेच घरातील पायऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. काही लोक तर वेळ मिळाल्यानंतर घरातील पायऱ्यांवर बसून तासनतास गप्पा मारण्याची सवय असते. पण, वास्तुशास्त्रानुसार पायऱ्यांवर बसणे योग्य आहे का? याविषयी वास्तुतज्ज्ञ काय सांगतात, याबद्दल जाणून घेऊया.

नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो

वास्तुशास्त्रानुसार, घरातील पायऱ्यांवर वारंवार बसल्याने घरात येणारी सकारात्मक ऊर्जा रोखली जाते. यामुळे वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो. परिणामी, घरात विनाकारण तणाव, चिंता आणि चिडचिडेपणाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे शक्यतो पायऱ्यांवर बसणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे

घराच्या प्रगतीमध्ये आणि समृद्धीमध्ये जिन्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पायऱ्यांवर वारंवार बसल्याने घराच्या आर्थिक प्रगतीत अडथळे निर्माण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. अशा वास्तूदोषामुळे व्यक्तीने कितीही पैसे कमवले, तरी हातात पैसा टिकत नाही. त्यामुळे खर्चाचे प्रमाण अनपेक्षितपणे वाढू लागते.

कौटुंबिक संबंधांवर आणि आरोग्यावर परिणाम

पायऱ्यांवर सतत बसण्याच्या सवयीमुळे घरातील ऊर्जेचे संतुलन बिघडते, ज्याचा थेट परिणाम कौटुंबिक नातेसंबंधांवर होतो. यामुळे घरातील सदस्यांमध्ये विनाकारण वाद आणि मतभेद वाढू शकतात. तसेच, मनात सतत जडपणा जाणवणे, आरोग्याच्या तक्रारी उद्भवणे आणि मानसिक शांतता लाभण्यात अडचणी येणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

या चुकाही टाळा

वास्तुतज्ज्ञांच्या मते, केवळ पायऱ्यांवर बसणेच नव्हे, तर त्यांच्याशी संबंधित इतर काही चुका देखील घरात दोष निर्माण करू शकतात. पायऱ्यांखाली कधीही देवघर, स्वयंपाकघर किंवा तिजोरी बनवू नये. तसेच तिथे कचरा किंवा चपला-बूट ठेवणे टाळावे. जिना नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान असावा. जर तुमच्या घरात असा वास्तूदोष असेल किंवा नकळत पायऱ्यांवर बसण्याची सवय झाली असेल, तर ती आजच बदला. पायऱ्यांचा योग्य मान राखल्यास घरात सुख-शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी टिकून राहण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...