Vastu Tips : गिफ्ट म्हणून या पाच गोष्टी कधीच कोणाला देऊ नका, नाहीतर आयुष्यात येईल मोठं वादळ

वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या कधीच गिफ्ट देऊ नयेत, कारण त्यामुळे तुमच्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

Vastu Tips : गिफ्ट म्हणून या पाच गोष्टी कधीच कोणाला देऊ नका, नाहीतर आयुष्यात येईल मोठं वादळ
| Updated on: Jul 27, 2025 | 1:33 PM

हिंदी धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे, वास्तुशास्त्रामध्ये अशा जवळपास सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, ज्या गोष्टी व्यक्तींच्या दैनंदीन जीवनाशी निगडीत आहेत. आपन अनेकदा लग्नकार्यामध्ये किंवा इतर शुभ प्रसंगी, वाढदिवसानिमित्त एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देतो, कोणत्या गोष्टी भेट म्हणून दिल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी भेट म्हणून देऊ नये, याचे सुद्धा निमय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे?

घड्याळ – वास्तुशास्त्रानुसार चुकूनही एखाद्या व्यक्तीला भेट म्हणून घड्याळ देऊ नये, कारण घड्याळ ही वेळशी संबंधित आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला घड्याळ भेट म्हणून देता, तेव्हा त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडतो, म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीला घड्याळ गिफ्ट देणं अशुभ मानलं गेलं आहे, आणि समजा तुम्हाला जर घड्याळच गिफ्ट द्यायचं असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही ज्या व्य्कतीला गिफ्ट देणार आहात, त्याच्याकडून रुपयाचा एक सिक्का घ्यावा, असं वास्तुशास्त्र सांगतं.

चाकू, धारदार वस्तू – वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीला धारदार वस्तू, जसं की चाकू, सुरी या गोष्टी गिफ्टमध्ये देणं टाळलं पाहिजे. अशा गोष्टी भेटीच्या स्वरुपात देणं अशुभ असतं, त्यामुळे गिफ्ट देणारा आणि घेणारा दोघांमध्ये दरार पडू शकते, वाद होऊ शकतात.

रुमाल – अनेक जण गिफ्ट म्हणून एखाद्याला रुमाल भेट देतात, मात्र वास्तुशास्त्रानुसार रुमाल हे आश्रूंचं प्रतिक आहे, यामुळे नकारात्मकता निर्माण होऊ शकते, त्यामुळे भेटीत रुमाल देऊ नका असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

मोती –  मोती तसं महागडं गिफ्ट आहे, मात्र मोती देखील आश्रूंचं प्रतिक आहे, त्यामुळे हे गिफ्ट देखील टाळलं पाहिजे.

काळ्या रंगाची कोणतीही वस्तू – वास्तुशास्त्रानुसार काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतिक आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला काळ्या रंगाची वस्तू देता, तेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे अशा वस्तू सुद्धा भेट म्हणून देऊ नयेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)