Vastu Tips: कापूराचे हे सोपे उपाय देतील वास्तुदोषापासून मुक्ती, घरात येईल सुख, समृद्धी
जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, घरात वादविवाद होतात, घर अशांत राहातं, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आज आपण कापूराच्या मदतीने वास्तुदोष कसा दूर करता येतो? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, घरात वादविवाद होतात, घर अशांत राहातं, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आज आपण कापूराच्या मदतीने वास्तुदोष कसा दूर करता येतो? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात कोणत्याही कारणामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल तर तुमच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, घरात काही कारण नसताना वाद होतात, घर अशांत राहातं. मात्र घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरात असलेल्या कापूराला खूप महत्त्व आहे, आज याच कापूराच्या मदतीनं आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशी नष्ट करू शकतो? आणि त्याचे आपल्याला काय-काय फायदे होऊ शकतात? याबद्दल माहिती घेणार आहोत.
जर तुमचं एखादं काम कितीही प्रयत्न केले तरी पूर्ण होत नसेल तर याच अर्थ तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असू शकते असा होतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दररोज सकाळी आणि सायंकाळच्या वेळी तुमच्या देवघरासमोर कापूर लावला पाहिजे, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, जाच्या परिणाम हा खूपच शुभ फळ देणारा असतो.
जर तुम्हाला धनाशी संबंधीत समस्या आहे, तुम्ही खूप कष्ट करतात प्रचंड पैसा कमवतात मात्र हातात धन शिल्लक राहत नाही तर यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगितला आहे, अशावेळी तुम्ही एका पात्रामध्ये लवंगेसोबत कापूर एकत्र करून तो लावला पाहिजे, यामुळे तुमची धनाशी संबंधित समस्या दूर होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.
जर तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असतील, हाती घेतलेलं एखादं काम पूर्ण होत नसेल, आरोग्याच्या समस्या असतील, छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरात भांडणं होत असतील तर याचा अर्थ तुमच्या घरात वास्तुदोष आहे. वास्तुदोष कसा दूर करायचा? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, मात्र त्यातील सर्वात सोपा उपाय म्हणजे घराच्या चारही कोपऱ्यात कापूर ठेवा,तो हवेच्या संर्पकात आल्यास हळूहळू विरघळेल, कापूर विरघळल्यानंतर पुन्हा तिथे कापूर ठेवा यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊन घरात सुख समृद्धी येते.
एवढंच नाही तर धन वृद्धीसाठी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजात, देवघरात देखील कापूर ठेवू शकतात, झोपताना उशीखाली कापूर ठेवल्यास मानसिक शांती लाभते असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
