AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vat Purnima 2026 : कधी आहे वटपौर्णिमा 28 की 29 जून? जाणून घ्या पूजेचा शूभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी

Vat Purnima 2026 : अधिक मास असल्यामुळे वटपौर्णिमा उशीरा आली आहे. वटपौर्णिमा हा विवाहित महिलांचा सण आहे. या दिवशी विवाहित महिला उपवास ठेवतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तर यंदाच्या वर्षी पौर्णिमा कधी आहे जाणून घ्या

Vat Purnima 2026 : कधी आहे वटपौर्णिमा 28 की 29 जून? जाणून घ्या पूजेचा शूभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी
Vat Purnima 2026
| Updated on: Jun 27, 2026 | 2:26 PM
Share

Vat Purnima 2026: पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वट सावित्री व्रत (Vat Purnima 2025) पाळले जाते. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. काही पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष दर्जा देण्यात आला आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा देखील यामध्ये समाविष्ट आहे. या दिवशी वट सावित्री व्रत पाळले जाते म्हणून याला वट पौर्णिमा असेही म्हणतात. सांगायचं झालं तर, नवविवाहित महिलांसाठी या सणावाला खास महत्त्व असतं. तर यंदा वर्षी वटपौर्णिमा कधी आहे आणि पूजा कशी करायची थोडक्यात जाणून घ्या…

ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जून 2026 रोजी सकाळी 8.35 वाजता सुरु होणार आहे, तर ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्ती 29 जून 2026 रोजी सकाळी 8.48 वाजता होणार आहे. तर उदय तिथीनुसार, ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून 2026 रोजी असल्यामुळे यंदाच्या वर्षातील वटपौर्णिमा सोमवारी 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. 29 जून 2026 रोजी म्हणजे येत्या सोमवारी वटपौर्णिमा महिला साजरी करु शकतात.

वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त

29 जून 2026 रोजी वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ वेळ सकाळी 8.55 ते 10:40 अशी आहे. विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाखाली एकत्रीत येतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. वडाच्या झाडाला 7, 11 किंवा 21 वेळा प्रदक्षिणा घालतात. दिवा लावतात आणि पूजा झाल्यानंतर, महिला सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकतात. शेवटी, आरती करतात आणि. प्रसाद वाटतात.

पूजेसाठी लागणारे साहित्य

हळदी – कुंकू, वडाला बांधण्यासाठी लागणारा दोरा, बांगड्या, मंगळसूत्र आणि अन्य सौभाग्यचं साहित्य, फुले, अक्षता, दिवा, विड्याची पाने, पाच फळे आणि पाण्याचा तांब्या…

कशी कराल पूजा…

वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान केली पाहिजे. त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जावं आणि झाडावा हळद कूकं वाहावं… त्यानंतर सावित्री देवी ला देवीला बांगड्या, मंगळसूत्र आणि इतर सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. त्यानंतर पतीच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.. वडाच्या झाडाभोवती पाण्याने प्रदक्षिणा घालावी. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे आणि आजही या दिवसाला मोठं महत्त्व आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?