Vikata Sankashti Chaturthi 2021 | विकट संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि पूजा विधी

Vikata Sankashti Chaturthi 2021 | विकट संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि पूजा विधी
Lord Ganesha

एकादशी प्रमाणेच चतुर्थी व्रत दर महिन्याला दोनदा ठेवला जातो. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात. दोन्ही उपवास गणपतीला समर्पित असतात. शुक्ल पक्षाची चतुर्थी विनायक चतुर्थी (Vinayaka Chaturthi) आणि कृष्ण पक्षाची चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते.

Nupur Chilkulwar

|

Apr 29, 2021 | 12:32 PM

मुंबई : एकादशी प्रमाणेच चतुर्थी व्रत दर महिन्याला दोनदा ठेवला जातो. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात. दोन्ही उपवास गणपतीला समर्पित असतात. शुक्ल पक्षाची चतुर्थी विनायक चतुर्थी (Vinayaka Chaturthi) आणि कृष्ण पक्षाची चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तसेच, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी किंवा विकट संकष्टी चतुर्थी म्हणतात (Vikata Sankashti Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat Importance And Puja Vidhi).

संकष्टी चतुर्थीचै उपवास कठीण काळ, संकटे आणि दु:खापासून मुक्त होण्यासाठी ठेवतात. या दिवशी महादेव आणि गौरीचे पुत्र श्रीगणेशाची पूजा अर्चना करुन त्यांना मोदक किंवा लाडूचे नैवेद्य दाखवले जाते आणि चंद्र दर्शनानंतर आणि अर्घ्यानंतर रात्री उपवास सोडला जातो. यावेळी विकट संकष्टी चतुर्थी 30 एप्रिल रोजी येत आहे. शुभ वेळ, पूजा करण्याची पद्धत आणि इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

शुभ काळ

संकष्टी चतुर्थी – 30 एप्रिल 2021, शुक्रवार

चतुर्थी तिथी सुरु होते – 29 एप्रिल 2021 रात्री 10 वाजून 09 मिनिटांपासून

चतुर्थी तिथी समाप्त – 30 एप्रिल 2021 सकाळी 7 वाजून 9 मिनिटांपर्यंत

चंद्रोदयाची वेळ – रात्री 10 वाजून 48 मिनिट

महत्त्व जाणून घ्या

गणपतीला शुभतेचे प्रतीक मानले जाते. जिथे गणरायाची श्रद्धा आणि भक्तीभावाने पूजा केली जाते तेथे कधीही काहीही अशुभ होत नाही. गणपतीला समर्पित संकष्टी चतुर्थी उपवास केल्यास घरातील सर्व नकारात्मक शक्तींचा प्रभाव दूर होतो. संकटे संपतात आणि इच्छा पूर्ण होतात. या दिवशी चंद्र दर्शनाला विशेष महत्त्व आहे. हा उपवास चंद्र दर्शनानंतरच पूर्ण मानला जातो.

पूजेची पद्धत

संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून नित्यकर्म करावे. आंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे घालावे आणि पूजेसाठी तयारी करावी. आता एका पाटावर गणेशाची प्रतिमा स्थापन करा आणि उपवासाचा संकल्प करा. त्यानंतर, गणपतीला धूप, दीप, 21 दुर्वा, शेंदूर, अक्षता, फूल आणि प्रसाद अर्पण करा. त्यानंतर ‘ॐ गणेशाय नमः‘ किंवा ‘ॐ गं गणपतये नमो नमः‘ या मंत्रांचा जप करावा. संध्याकाळी चंद्र दर्शनानंतर मध, चंदन आणि रोली मिश्रित दुधासह अर्घ्य अर्पण करा. यानंतर, उपवास सोडा.

Vikata Sankashti Chaturthi 2021 Know The Shubh Muhurat Importance And Puja Vidhi

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shree Ganesha | श्री गणेशाचं खरं मुख कुठे गेलं? पौराणिक कथा काय सांगते…

Shree Ganesha | भगवान श्री गणेशाचे वाहन मूषक का? चला जाणून घेऊ ही पौराणिक कथा…

Vinayaka Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी…

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें