Shree Ganesha | श्री गणेशाचं खरं मुख कुठे गेलं? पौराणिक कथा काय सांगते…

Shree Ganesha | श्री गणेशाचं खरं मुख कुठे गेलं? पौराणिक कथा काय सांगते...
ganesha

भगवान श्री गणेश सर्व लोकांचे दु:ख हरतात (Shree Ganesha). प्रथम पूजनीय गणेशाची श्रद्धापूर्वक पूजा केल्यास घरात सुख आणि समृद्धी नांदते आणि घरात भरभराट होते.

Nupur Chilkulwar

|

Apr 15, 2021 | 2:58 PM

मुंबई : भगवान श्री गणेश सर्व लोकांचे दु:ख हरतात (Shree Ganesha). प्रथम पूजनीय गणेशाची श्रद्धापूर्वक पूजा केल्यास घरात सुख आणि समृद्धी नांदते आणि घरात भरभराट होते. त्याच्याशिवाय कोणतीही उपासना पूर्ण होत नाही. पण काय तुम्हाला माहितीये गणेशाचे खरे डोके कुठे गेले होते? त्यांचं मुख गजमुख आहे, पण त्यांचं खरं मुख कठे आहे (Where Did Lord Shree Ganesha Real Head Gone Know The Story)?

धार्मिक शास्त्रात गणेशाचं वास्तविक मुख चंद्राकडे गेल्याचा उल्लेख आहे. भगवान गणेश हे गजमुख, गजानन म्हणूनही ओळखले जाते, कारण त्यांचा चेहरा गज म्हणजेच हत्तीचा आहे. भगवान गणेशाचे हे रुप अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ आहे. तुम्हीसुद्धा श्रीगणेशाचे गजानन बनण्याच्या पौराणिक प्रसंगाबाबत ऐकलं असेल, वाचलं असेल. चला आपण जाणून घेऊया भगवान गणेशाच्या वास्तविक मस्तकाच्या मनोरंजक पौराणिक कथेबाबत –

पौराणिक कथा

श्री गणेशाच्या जन्मासंदर्भात दोन पौराणिक कथा आहेत. पहिल्या कथेत असे म्हटले आहे की, पार्वतीने श्रीगणेशाला जन्म दिला होता. त्यावेळी इंद्र आणि चंद्र यांच्यासह सर्व देवी-देवतांनी त्यांना पाहण्यासाठी उपस्थित झाले. दरम्यान, शनिदेवही तिथे आले. असे म्हणतात की, जेथे शनिदेव यांची नजर पडते तिथे नुकसान किंवा वाईट गोष्टी घडणे निश्चित असते. शनिदेवाच्या दर्शनामुळे भगवान गणेशाचे मुख त्यांच्या शरीरापासून वेगळे होऊन चंद्रमंडळात गेले. यानंतर भगवान शंकरांनी गणेशाच्या मुखाच्या स्थानी गजमुख ठेवले.

दुसऱ्या कथेनुसार, देवी पार्वतीने आपल्या शरीराचा मळ काढला आणि त्यातून श्रीगणेशाचे स्वरुप तयार केले. त्यानंतर पार्वतीने गणेशला त्यांचे स्नान होईपर्यंत प्रवाशद्वारावर पाहारा ठेवण्यास सांगितला. तसेच, कोणालाही आत प्रवेश करु देऊ नये, असंही सांगितले. त्याचवेळी तिथे माहदेव आले. मात्र, आईच्या आज्ञेचं पालन करत गणेशाने महादेवाला आत प्रवेश करु दिला नाही. त्यामुळे महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी श्रीगणेशावर वार कर त्यांचे मस्तक शरिरापासून वेगळे केले, जे चंद्रलोकात गेले. त्यानंतर भगवान शंकरांनी क्रोधित पार्वतीला मनवण्यासाठी करण्यासाठी गणेशाच्या मस्तकाच्या जागी गजमुखाची स्थापना केली. असे मानले जाते की, श्रीगणेशाचे खरे मुख चंद्रमंडळात आहे.

धार्मिक मान्यतेनुसार वर्षभर संकष्टी चतुर्थीचे 13 व्रत ठेवले जातात. या तारखांना चंद्रदर्शन आणि अर्घ्य देऊन गणपतीची पूजा केली जाते. संकटनाश आणि शुभकामनाची प्रार्थना केली जाते.

Where Did Lord Shree Ganesha Real Head Gone Know The Story

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chaitra Navratri 2021 | नवरात्रीत अखंड ज्योत लावत असाल तर ‘या’ गोष्टीं लक्षात ठेवा, या नियमांचं पालन करा…

Saptarshi | सप्तर्षी म्हणजे काय, ते किती प्रकारचे असतात? जाणून घ्या…

Masik Shivratri 2021 | चैत्र मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची तिथी, मुहूर्त आणि महत्त्व…

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें