AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आहेत अनेक लाभ, यशस्वी लोकं पाळतात हा नियम

हिंदू धर्मात बह्म मुहूर्ताला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जर तुम्हालाही ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सवय असेल तर तुम्ही ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून काही खास उपाय अवश्य करावे. ब्रह्म मुहूर्तावर उठून  सर्वप्रथम काही मंत्रांचा जप करावा. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आहेत अनेक लाभ, यशस्वी लोकं पाळतात हा नियम
ब्रम्ह मुहूर्तImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 09, 2023 | 12:31 PM
Share

मुंबई : सनातन धर्मात ब्रह्म मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या दीड तास आधीच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त (Bramha Muhurat Benefits) म्हणतात. ज्याला शुभ मुहूर्त असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथ आणि धार्मिक पुराणांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे खूप महत्त्व दिले आहे. ब्रह्म मुहूर्त केवळ अध्यात्मिक दृष्टिकोनातूनच फायदेशीर मानला जात नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्म मुहूर्त हा देवपूजेसाठी अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो. जर तुम्हीही ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सवय लावली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. याशिवाय सनातन धर्मात अशी काही कामे सांगितली आहेत जी ब्रह्म मुहूर्तामध्ये केल्यास व्यक्तीला आर्थिक लाभ मिळू शकतो.

लक्ष्मीचा लाभतो विशेष आशीर्वाद

ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 4  ते पहाटे 5.30 अशी मानली जाते. या शुभ मुहूर्तावर जो उठतो त्याच्यावर माता लक्ष्मीची नेहमी विशेष कृपा असते.  ब्रह्म मुहूर्तावर उठून काही विशेष उपाय केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने जीवनात अपार यश मिळते. शरीरात सकारात्मक ऊर्जा राहते. हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते.

हे विशेष उपाय ठरतील फायदेशीर

जर तुम्हालाही ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सवय असेल तर तुम्ही ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून काही खास उपाय अवश्य करावे. ब्रह्म मुहूर्तावर उठून  सर्वप्रथम काही मंत्रांचा जप करावा. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी वातावरण शांत असते. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, महत्त्वाच्या योजना करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य मानला जातो. म्हणूनच ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी मनात कधीही नकारात्मक भावना आणू नये. अन्यथा, तुम्ही दिवसभर तणावाखाली असाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

सकाळी उठल्याबरोबर किंवा ब्रह्म मुहूर्तात अन्न ग्रहण करू नये. आरोग्याच्या दृष्टीने असे करणे शुभ मानले जात नाही. यावेळी जेवल्याने अनेक आजार होऊ शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल