महा कुंभमेळ्यातील पेशवाई म्हणजे काय? जाणून घ्या कोणाला घेता येतो सहभाग
13 जानेवारी 2025 पासून महा कुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे. पेशवाई हा महा कुंभमेळ्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि भव्य सोहळा आहे. ही एक मिरवणूक आहे ज्यामध्ये विविध आखाड्यातील ऋषी संत राजेशाही कुंभनगरीमध्ये प्रवेश करतात. ही शतकानूशतके चालत आलेली ऐतिहासिक परंपरा आहे. जाणून घेऊया या परंपरेबद्दल सविस्तर

प्रयागराज येथे 2025 मध्ये महा कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. हा कुंभमेळा 45 दिवस चालणार आहे. या महा कुंभमेळ्यात श्रद्धेने स्नान करण्यासाठी देश-विदेशातील लोक येणार आहेत. या धार्मिक उत्सवा दरम्यान प्रयागराजच्या संगमासह प्रमुख घाटांवर स्नानांसाठी साधू मुनींचा मेळावा होणार आहे. महा कुंभाच्या वेळी आखाड्याची पेशवाई घडते जी अतिशय खास मानले जाते. जाणून घेऊया कुंभमेळ्याच्या वेळी आखाड्याच्या पेशवाईचा काय अर्थ असतो? या आखाड्याच्या पेशवाई मध्ये कोण सहभागी होऊ शकते?
सर्वात मोठा धार्मिक उत्सव
महा कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सण आहे. यापेक्षा मोठा धार्मिक सण कोणताही नाही असे मानले जाते. सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी आणि समाजाशी धर्माची नाळ जोडण्यासाठी महा कुंभ मिळाव्याचे आयोजन केल्या जाते आणि मोठ्या उत्साहात हा उत्साह साजरा केला जातो. ऋषी-मुनी हे महा कुंभाचे वाहक मानले जातात. या संतांनी प्रतिकूल परिस्थितीतही धर्मांचा रक्षण आणि बळकटीकरण केले. तसेच जेव्हा गरज पडली तेव्हा धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी शस्त्र उचलण्यास या संतांनी मागेपुढे पाहिले नाही.
काय आहे आखाड्याची पेशवाई?
प्रयागराज मध्ये महा कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. संगमासह सर्व घाट सुशोभित करण्यास सुरुवात झाली असून महा कुंभमेळा सुरू होईल तोपर्यंत प्रयागराजचे भव्य रूप दिसू लागेल. यावेळी संगम नगरीत साधूं- मुनींचे भव्य सादरीकरणही पाहायला मिळणार आहे. महा कुंभमेळ्यातील आखाड्याची पेशवाई महत्त्वाची आणि विशेष मानली जाते.
आखाड्यातील साधुसंत राजेशाही थाटात कुंभ मेळाव्यात येतात. तेव्हा त्याला पेशवाई म्हणतात राजे आणि सम्राट यांच्या प्रमाणेच संत आणि ऋषींची शाही मिरवणूक हत्ती, घोडे आणि रथावरून निघते. या वेळेला तिथे उपस्थित भाविक संतांचे स्वागत करतात. हे संत आपापल्या आखाड्यांचे झेंडे हातात धरतात. ऋषीमुनी हातात ध्वज घेऊन आपल्या सैन्यांसह पूर्ण विधी करून शहरा बाहेर पडतात. ऋषी-मुनींची पेशवाई पाहण्यासाठी जगभरातून लोक कुंभमेळायला येतात. 2025 मध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे. हा कुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
