Vastu Tips : घरात आरसा लावताना ही चुक टाळाच, परिणाम आहेत खूप भयंकर, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रामध्ये घरात आरसा कोणत्या दिशेला असावा? याबद्दलचे देखील नियम सांगितले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊयात.

घराची सजावट करत असताना त्यामध्ये आरशाची भूमिका महत्त्वाची असते. अनेक जण घराची सजावट करताना अनेक ठिकाणी आरशाचा उपयोग करतात. भिंतीला लावलेले आरसे सुंदर दिसतात. आपलं घर सुंदर दिसावं यासाठी अनेक जण महागड्या युनिक आणि स्टाइलिश डिझायन असलेल्या आरशांचा उपयोग करतात. मात्र वास्तुशास्त्रामध्ये आरशाला देखील मोठं महत्त्व असतं हे खूप थोड्या लोकांना माहिती आहे. वास्तुशास्त्रानुसार आरसा ही केवळ एक सजावटीची वस्तू नाही तर तो एक ऊर्जाचा स्त्रोत देखील आहे, तुम्ही तुमच्या घरात लावलेला आरसा जर योग्य जागी आणि योग्य दिशेला असेल तर त्यामधून तुमच्या घरात सतत सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होत राहाते, मात्र जर तो चुकीच्या दिशेला लावला गेला तर या सकारात्मक ऊर्जेचं रूपांतर नकारात्मक शक्तिमध्ये होतं. चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगतं.
बेडच्या समोर आरसा नसावा – बेडरूम हा तुमच्या घरातील एक महत्त्वाचा भाग असतो. तुम्ही दिवसभर थकलेले असतात, दमलेले असतात अशा स्थितीमध्ये ते तुमच्या आरामाचं एक हक्काचं ठिकाण असतं. मात्र तुम्ही जर तुमच्या बेडच्या समोर आरसा लावलेला असेल तर तो तुमची ऊर्ज रिफ्लेक्ट करतो. जेव्हा तुम्ही झोपलेले असतात तेव्हा तुमच्या शरीराची ऊर्जा शांत असते, मात्र आरसा तुमची ऊर्जा रिफ्लेक्ट करतो, त्यामुळे तुमच्या झोपेमध्ये अडथळा निर्माण होतो. तुम्ही अशांत राहतात. घरात आजारपण वाढतं. पती-पत्नीमध्ये कारण नसताना वाद निर्माण होतात.
अग्नेय दिशेला आरसा नसावा- अग्नेय म्हणजे दक्षिण आणि पूर्व दिशेच्या कोपऱ्यामध्ये आरसा ठेवू नये, या दिशेला ऊर्जा, उत्साह आणि निर्णय शक्तिचं प्रतिक मानलं जातं. मात्र जर तुम्ही या दिशेला आरसा ठेवला तर तुमच्या घरात येणारी संपूर्ण सकारात्मक ऊर्जा परावर्तीत होते, यामुळे तुमच्या घरात नेहमी वाद होतात. घरात शांती राहात नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं.
घरात कधीही तुटलेला आरसा नसावा – तुटलेला आरसा घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. तुटलेल्या आरशामध्ये कधीही चेहरा पाहू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. तुटलेल्या आरशामधून कायम नकारात्मक ऊर्ज प्रवाहीत होत असते. त्यामुळे जर घरात तुटलेला आरसा असेल तर तो घराच्या बाहेर काढावा असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
