AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत व्यक्तीच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्याचं कारण माहितीये? एका शापाशी जोडली गेलीये कथा

आपल्या हिंदू धर्मात मृत व्यक्तींची अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या जातात. यामागे अनेक पौराणिक कथा आहेत, ज्यावरून अस्थी विशेषतः गंगेत का विसर्जित केल्या जातात हे स्पष्ट होते.

मृत व्यक्तीच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्याचं कारण माहितीये? एका शापाशी जोडली गेलीये कथा
| Edited By: | Updated on: Jan 25, 2025 | 7:33 PM
Share

हिंदू धर्मात जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीरावर पूर्ण विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले जातात. त्यानंतर मृत व्यक्तीची अस्थी पवित्र गंगा नदीत विसर्जित केल्या जातात. तर बहुतांश लोकं हरिद्वारमधील हर की पौडी येथे अस्थी विसर्जनासाठी येतात. त्यानंतर ते येथील गंगा नदीत अस्थी विसर्जित करतात. तसेच प्रयागराजमध्येही अस्थी विसर्जन केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का अस्थी खास करून गंगा नदीत का विसर्जित केल्या जातात?

गंगा नदीतच अस्थी का विसर्जित केल्या जातात याच्याशी सुद्धा निगडित अनेक कथा हेत. असे मानले जाते की गंगा मातेवर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे. जोपर्यंत मृताच्या अस्थी गंगा नदीच्या पाण्यात तरंगतात किंवा राहतात, तोपर्यंत आत्म्याला भगवान श्रीकृष्णाच्या गोलोक धाममध्ये निवास करण्याची संधी मिळते.

असेही म्हटले जाते की भगीरथांनी गंगा मातेला स्वर्गातून सांसारिक राज्यात आणले. अशा प्रकारे मृत्यूनंतर जोपर्यंत मनुष्याची अस्थी गंगेत वाहते तोपर्यंत त्याच्या आत्म्याला स्वर्गीय लोकात राहण्याची संधी मिळते.

तर एका आख्यायिकेनुसार, कपिल ऋषींच्या शापामुळे राजा सागरचे 60,000 पुत्र मरण पावले. अशा स्थितीत राजा सागरचे वंशज भगीरथ यांनी गंगा मातेला सांसारिक राज्यात आणण्यासाठी तीव्र तपश्चर्या केली आणि सागरपुत्रांची मुक्तता केली. म्हणून मृत व्यक्तीची अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्यास त्यांना मुख्ति मिळते.

राजा शंतनूने गंगा मातेशी विवाह केला

आणखी एका कथेनुसार हस्तिनापूरचा राजा शंतनू गंगा मातेच्या प्रेमात पडले होते. या परिस्थितीत त्यांनी गंगा मातेशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यावेळी गंगा मातेने काहीही करण्यापासून रोखणार नाही अशी अट राजापुढे मांडली त्यानंतरच लग्न करणार असल्याचे गंगा मातेने सांगितले. राजा शंतनूने गंगा मातेची अटी मान्य केल्या. लग्नानंतर जेव्हा त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला, तेव्हा गंगा मातेने त्यांना स्वतःच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ दिले. हे पाहून शंतनूला खूप वाईट वाटलं पण ते अटी पुढे काहीच बोलू शकले नाही.

भीष्म पितामह हा गंगेचा आठवा पुत्र होता

त्याचप्रमाणे गंगा मातेने सात पुत्रांचे गंगेत विसर्जन केले आणि जेव्हा गंगा मातेने आपल्या आठव्या मुलाला पाण्यात प्रवाहात वाहून देणार होत्या तेव्हा शंतनूराजाला ते सहन झाले नाही आणि त्यांनी गंगा मातेला थांबवले. त्यानंतर राजाने गंगा मातेला विचारले की तुम्ही असे का करते आहात? त्यावर गंगा मातेने उत्तर दिले की, आपल्या पुत्रांना वशिष्ठांनी ऐहिक लोकात जन्म घेऊन दु:ख भोगण्याचा शाप दिला होता. अशा प्रकारे मी त्यांना गंगेत विसर्जित करून मुक्त करीत आहे. मात्र, आता आठव्या मुलाचे पाण्याच्या प्रवाहात सोडता येणार नाही. त्याला ऐहिक जगात दु:ख भोगावे लागेल. भीष्म पितामह हे गंगा मातेचे आठवे पुत्र होते. म्हणूनच ज्याप्रमाणे गंगा मातेने आपल्या पुत्रांना त्यांच्या मुक्तीसाठी विसर्जित केले, त्याचप्रमाणे मुक्तीसाठी अस्थीही गंगेत विसर्जित केल्या जातात.

आणि अस्थींचे विसर्जन कुठे करता येईल?

गंगा नदीबरोबरच नर्मदा, गोदावरी, कृष्णा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्येही अस्थी विसर्जित करता येतात. अस्थी विसर्जनासाठी अस्थी दूध व गंगेच्या पाण्याने धुवून कलशात किंवा पिवळ्या कापडापासून बनविलेल्या पिशवीत ठेवली जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.