AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन घरात राहायला जाण्याआधी का करतात वास्तूशांती? 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण

अनेक वेळा आपल्याला आपल्या इच्छेनुसार आणि वास्तूनुसार प्लॉट किंवा घर मिळत नाही. या कारणास्तव हा भूखंड दोषांनी भरलेला आहे. हे दोष दूर करण्यासाठी, शांततेसाठी उपाय करणे आवश्यक आहे.

नवीन घरात राहायला जाण्याआधी का करतात वास्तूशांती? 99 टक्के लोकांना नाही माहिती हे कारण
वास्तूशांती पूजाImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 26, 2023 | 5:03 PM
Share

मुंबई : प्रत्येकाचे स्वप्न असते की स्वतःच्या हक्काच्या घरात राहायहा जावे. स्वतःचं हक्काच्या घरात सुख समृद्धी राहावी आणि बरकत लाभावी अशी प्रत्त्येकाचीच इच्छा असते.  जेव्हा आपण नवीन घर खरेदी करतो किंवा बांधतो त्यावेळेस अनेकदा आपण एकतर वास्तूशास्त्राकडे (Vastushastra)  लक्ष देत नाही किंवा लक्ष देऊनही काही ना काही कमतरता राहून जाते. ते दूर करण्यासाठी घरात प्रवेश करण्यापूर्वी हवन, ग्रहशांती, शुद्धीकरण आदी पूजा करून घेतली जाते. गृहप्रवेशाच्या पूजेने घरात सुख-समृद्धी येते. घर शुद्ध होते, घरातील नकारात्मकता दूर होते. गृहप्रवेशाच्या पूजेमध्ये आपण आपल्या इष्टदेवाची पूजा करतो, त्यामुळे देवतांचा घरात वास असतो.

या पाच घटकांचा असतो समावेश

वास्तुशास्त्रात सृष्टीचे पाच मुख्य घटक अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. आकाश, पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू ही मुख्य पाच तत्त्वे आहेत, वास्तुशांतीमध्ये ही पाच तत्त्वे आणि सर्व दिशा शांत आहेत. ज्यामुळे सर्व प्रकारच्या वास्तुदोषांचा प्रभाव दूर होतो. गृहप्रवेश करण्यापूर्वी  वास्तुशांती करणे फार महत्वाचे आहे. परंतु ते केवळ शुभ मुहूर्तावरच केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोणता दिवस, तिथी आणि नक्षत्र शुभ असतो.

वास्तुशांतीसाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस वास्तूशांती करण्यासाठी शुभ मानले जातात. यासाठी शुक्ल पक्षातील द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी या तिथी शुभ मानल्या जातात. अश्विनी, उत्तरफाल्गुनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, उत्तराषाद, उत्तराभाद्रपदा, रोहिणी, श्रावण, रेवती, शतभिषा, स्वाती, अनुराधा इत्यादी नक्षत्रे शुभ आहेत. याशिवाय पुरोहिताकडून विशेष तिथी किंवा मुहूर्त काढू शकता.

या कारणांसाठी आवश्यक आहे वास्तूशांती

अनेक वेळा आपल्याला आपल्या इच्छेनुसार आणि वास्तूनुसार प्लॉट किंवा घर मिळत नाही. या कारणास्तव हा भूखंड दोषांनी भरलेला आहे. हे दोष दूर करण्यासाठी, शांततेसाठी उपाय करणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा आपण वास्तूनुसार प्लॉट निवडतो, पण इमारत बांधताना काही अनवधानाने दोष निर्माण होतात. त्यामुळे पैशाचे नुकसान सहन करावे लागते. भविष्यात अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून आपण वास्तुशांती उपायांचा अवलंब करतो. कारण समस्या उद्भवण्यापूर्वीच त्यावर उपाय करणे शहाणपणाचे असते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.