कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी साखर आणि दही का खाल्लं जातं? तुम्हालाही माहिती नसेल खरं कारण
ज्योतिषशास्त्रानुसार कोणंतही शुभ काम करण्यापूर्वी दही आणि साखर खाणं शुभ मानलं जातं. जाणून घेऊयात त्यामागे नेमकं काय कारण आहे. दही आणि साखरच का खाल्ली जाते.

भारतीय संस्कृतीमध्ये कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी दही आणि साखर खाण्याची प्रथा आहे. तुम्ही अनेकदा असा अनुभव घेतला असेल की, परीक्षेला जाण्यापूर्वी, नव्या नोकरीत रुजू होण्यापूर्वी किंवा प्रवास सुरू करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला दही आणि साखर खायला देतात. अनेक लोक असा विचार करतात की ही फक्त एक धार्मिक प्रथा आहे, जी शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. मात्र ही फक्त एक धार्मिक प्रथाच नाही तर त्यामागे विज्ञान देखील आहे. दही आणि साखर एकत्र खाल्ल्यास तुमच्या शरीराला त्यातून अनेक फायदे होतात. त्यामुळे ऊर्जा आणि मानसिक शांती मिळते.
ज्योतिषशास्त्रानुसार कोणंतही शुभ काम करण्यापूर्वी दही आणि साखर खाणं शुभ मानलं जातं. विशेष: एखाद्या परीक्षेला जाण्यापूर्वी, तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू करणार असाल तर त्यापूर्वी तसेच तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडणार असाल तर त्यापूर्वी हिंदू धर्मामध्ये दही आणि साखर खाण्याची प्रथा आहे. दही आणि साखर खाल्ल्यानं तुम्ही ज्या कामासाठी जाणार असाल त्या कामात तुम्हाला यश मिळतं अशी मान्यता आहे. मात्र या प्रथमागे केवळ धार्मिक कारणच नाही तर काही वैज्ञानिक कारणं देखील आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाणार असाल, समजा तुम्ही परीक्षा देण्यासाठी जात असाल किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल तर तुम्हाला थोडं तरी टेन्शन असतंच. अशा स्थितीमध्ये तुम्ही जर दही आणि साखरेचं सेवन केल्यास ते तुमच्या शरीराला ऊर्ज प्रदान करतं. साखर ही ग्लूकोजचा उत्तर स्त्रोत आहे, ती तुमच्या मेंदूला अधिक ऊर्ज पुरवते त्यामुळे तुमचा मेंदू अधिक कार्यक्षम होतो, तर दुसरीकडे दही हे प्रोबायोटिक आहे, जे तुमची पचनक्षमता सुधारण्यास मदत करते. तुम्हाला दह्यामधून ऊर्ज मिळते. तुमचं शरीर दह्यामुळे थंड राहातं, म्हणून कोणत्याही कामाला जाण्यापूर्वी तुमच्या घरचे तुम्हाला साखर आणि दही खाण्याचा सल्ला देतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.