संकष्टी चतुर्थीला गणपतीला का दाखवला जातो तीळकुटाचा नैवेद्य? जाणून घ्या या मागचे कारण
संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास करणाऱ्याचे सर्व त्रास दूर होतात. त्याशिवाय घरात सुख समृद्धी टिकून राहते. संकष्टी चतुर्थीला गणपतीला तीळकुट अर्पण केल्या जाते. जाणून घेऊ या दिवशी गणपतीला तीळकुटाचा नैवेद्य का अर्पण केला जातो.

हिंदू धर्मात चतुर्थी तिथी फार महत्त्वाची मानली जाते. दर महिन्यात ही तिथी दोन वेळेला येते कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीच्या तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी विघ्न दूर करणाऱ्या गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी गणपतीचा उपवास देखील केला जातो. अशी मान्यता आहे की संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याने घरात सुख समृद्धी येते. तसेच मुलांचे उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केला जातो.
कधी आहे संकष्टी चतुर्थी
पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीची तारीख 17 जानेवारी आहे. या दिवशी शुक्रवार असून माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी 17 जानेवारीला पहाटे 4: 18 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी 18 तारखेला संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार 17 जानेवारीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाणार आहे.
गणपतीला का दाखवला जातो तीळकूटाचा नैवेद्य?
संकष्टी चतुर्थी तीळकूटाचा प्रसाद गणपतीला अर्पण केला जातो. म्हणूनच याला तीळकूट चतुर्थी असे म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की संकष्टी चतुर्थीला गणपतीला तीळकूटाचा नैवेद्य का दाखवला जातो?




गणपतीला तीळकूटाचा नैवेद्य का असतो?
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला अनेक प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात असे मानले जाते की हे गणपतीला तीळकूट आणि लाडू अत्यंत प्रिय आहेत. संकष्टी चतुर्थीच्या व्रतकथेनुसार माघ महिन्यात तीळ आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवणे अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात. संकष्टी चतुर्थीचा उपवास मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी केल्या जातो. त्यामुळे महिला गणपतीला तीळ आणि गुळापासून पदार्थ बनवतात आणि ते गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार गणपतीला तीळकूट अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि तिळाचे पदार्थ अर्पण करणाऱ्यांचे सर्व संकट बाप्पा दूर करतात. तसेच मुलांचे आरोग्य चांगले राहते यामुळेच संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला तीळकूट अर्पण केल्या जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)