पत्नीच्या ‘या’ 8 सवयी पतीला करतील कंगाल, ताबडतोब करा सुधारणा
अनेकदा आर्थिक अडचणींमुळे घरांमध्ये कलहाचे वातावरण निर्माण होत असते. जाणूनबुजून महिलांनी केलेल्या काही चुकांमुळे घरात आर्थिक संकट उभे राहते. जाणून घेऊया सविस्तर.

प्रत्येक नवरा-बायकोचं नातं हे अतिशय घट्ट आणि विश्वासार्ह नातं मानलं जातं. या दोघांच्या आयुष्यात पत्नी पतीच्या सर्व कामात मदत करणे. नवऱ्याने आर्थिकदृष्ट्या भक्कम व्हावा आणि पतीला आयुष्यात सर्व सुखसोयी मिळाव्यात अशी प्रत्येक पत्नीची इच्छा असते. जीवनामध्ये नवरा-बायको हे एकमेकांचे खरे साथीदार आहेत, म्हणून याचे वर्णन जन्म-जन्माचे नाते असे करण्यात आले आहे.
पण ज्योतिषशास्त्रानुसार घरातील महिलांच्या काही सवयी अशा असतात ज्या नकळत नवऱ्यासाठी मोठी समस्या निर्माण करतात. महिलांच्या या चुकांमुळे लक्ष्मी त्यांच्या घरात कायमस्वरुपी राहत नाही. किंवा कष्ट करूनही त्यांच्या घरात पैशांची चणचण भासते. नशीब त्यांना साथ देत नाही आणि मग घरात कलहाचे वातावरण तयार होऊ लागते. ज्याने दोघांच्या नात्यात समस्या निर्माण होतात. तर नकळतपणे अश्या कोणत्या चुका महिलांकडून होत असतात ज्याने आर्थिक अडचणी निर्माण होतात. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पत्नीने कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत. घरातील महिलांनी या सवयी सुधारल्या तर घरातील क्लेश थांबतील आणि आर्थिक स्थिती चांगली राहील.
पत्नीने या सवयी बदलाव्यात
अनेक महिला या संध्याकाळच्या वेळेत शेजाऱ्यांकडून दही घेऊन येतात. ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी घरात दही आणल्याने धनाची देवी लक्ष्मी ही रुसून घराबाहेर निघून जाते. अशाने घरात कलह आणि आर्थिक स्थिती मंदावते.
वास्तुनुसार सकाळी किंवा संध्याकाळी मळून ठेवलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवल्याने घरातील लक्ष्मीदेवी नाराज होते. त्यामुळे पीठ नेहमी गरज असेल तेव्हाच मळून घ्यावे, आधीच मळलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवल्यास लक्ष्मी देवी रुसून बसते आणि घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात.
जेवण बनवल्या नंतर अनेक महिला वॉश बेसिंगमध्ये खरकटी भांडी तसेच ठेवतात. त्यामुळे घरातील लक्ष्मीदेवीचा वास घरातून निघून जातो.
अनेकदा स्वयंपाक केल्यानंतर महिला कढई किंवा तवा बंद गॅसवर तसाच ठेऊन देतात. त्यामुळे घरातील महिलांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
तसेच अनेक महिलांची सवय असते की जेवण बनवून झाल्या नंतर लगेच गरम असलेली शेगडी पुसून ठेवतात. मात्र असं केल्याने लक्ष्मी देवी नाराज होते.
आपल्यापैकी अनेक महिला या जेवण वाढताना एकाच वेळी पतीला किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना ताटामध्ये तीन चपाती वाढतात, यामुळे ही घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते.
आपण नेहमी घरात झाडू घेतल्यानंतर तो झाडू तसाच ठेऊन देतो. पण असे न करता झाडू नेहमी लपवून ठेवावा. झाडू कधीही उभा ठेवू नये.
जेव्हा पती-पत्नी मध्ये वारंवार भांडण होत असतात. तेव्हा भांडण झाल्यावर पती रागात घरातून बाहेर जात असेल तर त्याचवेळी घरातील लक्ष्मीचा वास देखील घरातून बाहेर निघून जातो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
