चाणक्य नीती : ‘या’ 5 गोष्टी बायका आपल्या नवऱ्याला कधीच सांगत नाही
चाणक्य यांनी मानवी जीवनाशी संबंधित सर्व पैलूंवर त्यांनी धोरणे आखली आहेत. त्यातच चाणक्य नीती यांच्या नुसार लग्नानंतर नवरा बायकोच मत हे विश्वासावरच टिकून राहते आणि त्यांचा संसार चांगला चालतो. तर काही बायका या आपल्या नवऱ्याशी काही गोष्टी कधीच सांगत नाही कारण संसार तुटण्याची भीती, नवरा रागावण्याची भीती, नवऱ्याची संशयी वृत्ती वाढण्याची भीती या सर्व गोष्टी या मागे असतात. त्यामुळेच त्या या गोष्टी लपवत असतात.

आपल्या सर्वांनाच माहित आहे कि, आचार्य चाणक्य हे भारतातील महान विद्वान आणि विद्वानांपैकी एक मानले गेले आहेत. व त्यांची धोरणे हे जगभर प्रसिद्ध असल्याने त्यांना चाणक्य नीती म्हणून ओळखले जाते. चाणक्य यांनी मानवी जीवनाशी संबंधित सर्व पैलूंवर त्यांनी धोरणे आखली आहेत. याच पैलूंच्या आधारे माणूस त्याच्या आयुष्यात प्रगती करू शकतो. तसेच अनेक अडथळे सुद्धा दूर करता येतात. आचार्य चाणक्य यांच्या या धोरणाचे आत्मसात केल्यास माणूस वाईट गोष्टीतून बाहेर पडून चांगली कामे करतो. त्यातच चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कोणतीही पत्नी आपल्या पतीला सांगत नाही, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या गोष्टींची माहिती देत आहोत, तर चला जाणून घेऊया आजचे चाणक्य धोरण.
चाणक्य नीतीनुसार कोणतीही बाई आपल्या पतीला तिच्या भूतकाळाचा म्हणजेच प्रेमप्रकरणाचा उल्लेखही करत नाही कारण पतीला याची माहिती मिळाली तर त्यांचा दृष्टिकोन बदलेल अशी भीती बाईला वाटते. त्यामुळे संसार मोडण्याची देखील भीती असल्याने काही गोष्टींचा उल्लेख करत नाही.
आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार बायका आपल्या पतीला त्यांच्या आजारांबद्दल लवकर सांगत नाहीत, जेव्हा त्या खूप अस्वस्थ होतात व आजारपण सहन न झाल्यास तेव्हाच त्यांचा उल्लेख नवऱ्यासमोर करतात.




एखाद्या स्त्रीला जेव्हा तिच्या पूर्वीच्या आयुष्यात कधीतरी बदनामीचा सामना करावा लागला असेल, तर ती आपल्या नवऱ्याला या गोष्टी सांगत नाही. तसेच नवऱ्याबद्दलची असलेली एखादी गोष्ट सुद्धा कोणाला सांगत नाही, असे सांगितल्याने तिचे वैवाहिक जीवन बिघडू शकते, असे बाईला वाटते.
कोणतीही स्त्री आपल्या माहेरच्या असलेल्या घरविषयीचे गुपित किंवा काही वाईट घटना आपल्या नवऱ्याशी शेअर करत नाही कारण तिला असे वाटतं की यामुळे तिच्या कुटुंबाचा मान सन्मान कमी होऊ शकतो.
संसार चालवत असताना प्रत्येक बाई पैशांची बचत करत असते जेणेकरून गरजेच्या वेळेस त्याचा योग्य वापर व्हावा. त्यामुळे काही बायका त्यांनी लपवलेल्या पैशांबद्दल आपल्या नवऱ्यालाही सांगत नाहीत कारण ते हे पैसे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीसाठी वापरता येऊ शकतात. तसेच अडचणीच्या काळात तो पैसे वापरता येईल अशी प्रत्येक बाईची त्यामागची धारणा असते.