AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यमुना जल घरी का ठेवत नाहीत? धर्मशास्त्रानुसार थेट यमलोकाशी संबंध

हिंदू धर्मात नद्यांचं पावित्र्य सांगण्यात आलं आहे. नद्यांची पूजा आणि त्यांचं जल पवित्र मानलं गेलं आहे. गंगा आणि यमुना या नद्या हिंदू धर्मात पवित्र मानल्या गेल्या आहेत. पण यमुनेचं पाणी घरात ठेवणं शुभ मानलं जात नाही. असं का? त्या मागे काय आहे कारण? चला जाणून घेऊयात धार्मिक कथा

यमुना जल घरी का ठेवत नाहीत? धर्मशास्त्रानुसार थेट यमलोकाशी संबंध
यमुना जल घरी का ठेवत नाहीत? धर्मशास्त्रानुसार थेट यमलोकाशी असा आहे संबंध
| Updated on: Aug 01, 2025 | 5:55 PM
Share

हिंदू धर्मात गंगा नदीसह यमुनेचंही नाव घेतलं जातं. कारण गंगेइतकंच यमुना नदीचं महत्त्व आहे. यमुना नदीचं मोठ्या श्रद्धेने पूजन केलं जातं. यमुना नदीला हिंदू धर्मात देवीचा दर्जा आहे. या नदीला पापनाशिनी, काळनाशिनी आणि मोक्षदायिनी संबोधलं जातं. पण या नदीचं जल घरात ठेवण्यास मनाई आहे. कारण धार्मिक मान्यतेनुसार, घरात नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे या नदीचं महत्त्व फक्त पूजा पाठ किंवा त्यात स्नान करण्यापर्यंत मर्यादीत ठेवणं योग्य ठरतं. या मागे लोक मान्यता आहे असं नाही. यमदेव, तर्पण आणि मृत्यूशी संबंधित गोष्टीही आहे. या नदीचं संबंध थेट भगवान श्रीकृष्णाशी निगडीत आहे. शास्त्रानुसार, यमुना देवी ही सूर्यदेवांची मुलगी आणि यमदेवांची बहीण आहे. या नदीला कालिंदी असंही संबोधलं जातं. कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीजेच्या दिवशी यमराज बहीण यमुनेच्या घरी येतात. तसेच आशीर्वाद देतात. या दिवशी भाऊ आणि बहीणेने यमुना जल स्नान केलं तर त्यांचा अकाली मृत्यू होत नाही.

यमुनेचा थेट यमदेवांशी संबंध

यमुनेचा थेट संबंध यमदेवांशी म्हणजेच मृत्यूच्या देवतेशी येतो. त्यामुळे यमुनाजल घरात ठेवण्यास मनाई आहे. यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो. यामुळे गंगाजल हे जीवनदायिनी मानलं जाते. तर यमुना जल हे फक्त व्रतवैकल्यांसाटी तीर्थ म्हणून वापरलं जातं. गरुड पुराण आणि पद्म पुराणातही यमुना नदीचा उल्लेख केला आहे. यमुना नदीचं तीर्थ स्नान आणि प्रायश्चित्त कर्मासाठी केलं पाहीजे. त्यामुळे घरात हे जल ठेवू नये. कारण घात मृत्यू, आजार आणि भांडणाचं कारण ठरू शकतं. वास्तुशास्त्रानुसार, यमुनेचं जल अस्थिरतेचं प्रतीक आहे. घरात साठवून ठेवल्यास दारिद्र्य आणि मानसिक त्रास वाढतो.

श्रीकृष्ण आणि यमुनेचं नातं

पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हा वासुदेव त्याने मथुरेतून गोकुळात घेऊन जात होते. तेव्हा यमुनेने त्यांना रस्ता दाखवला होता. आख्यायिकेनुसार, यमुनेनं बालकृष्णाचे चरण स्पर्श करण्यासाठी पातळी वाढवली आणि पवित्र स्पर्शाने पवित्र झाली. भगवान कृष्णांचा लीला करण्याचं केंद्र वृंदावन आणि यमुना तट आहे. गोपिकांसोबत रासलीला, कालिया नागासोबत युद्ध, लोणी चोरणं हे सर्व काही यमुनेच्या तीरावर घडलं. यमुनेला श्रीकृष्णाची पत्नी मानलं जाते. पौराणिक मान्यतेनुसार, यमुनेला भगवान श्रीकृष्णांकूडन वरदान मिळालं आहे की, ती कायम त्यांच्या चरणी राहील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.