WCL 2025 : 8 SIX…एबी डीविलियर्सने आधी धुतलं, मग अशी कॅच घेतली की सगळेच थक्क, भारताचा मोठा पराभव VIDEO
AB de Villiers WCL 2025 : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सच्या दुसऱ्या सीजनमध्ये भारतीय टीम पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळली नव्हती. त्यामुळे 2 पॉइंट्सच नुकसान झालेलं. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात एबी डीविलियर्सने शानदार प्रदर्शन केलं. भारत या स्पर्धेत डिफेंडिंग चॅम्पियन आहे.

दक्षिण आफ्रिकेचा अव्वल फलंदाज एबी डीविलियर्स आता क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झालाय. पण त्याचा क्लास अजून कायम आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेच्या निमित्ताने एबी डीविलियर्सचा पुन्हा एकदा दर्जा दिसून आला. एबी डीविलियर्सच वय आता 41 आहे. क्रिकेटच्या मैदानात तो आजही उतरला की, तसाच खेळ पहायला मिळतो. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सचा हा दुसरा सीजन आहे. मंगळवारी भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना झाला. त्यावेळी सगळा फोकस फलंदाज एबी डीविलियर्सवर होता. आधी त्याची बॅट तळपली. मग, फिल्डिंग करताना त्याचा जोश दिसला. 37 चेंडूत शतक झळकवणाऱ्या खेळाडूची त्याने अशी कॅच घेतली की, सगळेच आश्चर्यचकीत झाले.
41 वर्षाच्या एबी डीविलियर्सने अशी धमाकेदार फलंदाजी केली की, भारताचा प्रत्येक गोलंदाज त्याच्यासमोर कमकुवत दिसला. एकाही भारतीय गोलंदाजाला त्याला आऊट करता आलं नाही. अखेरीस नाबाद राहत त्याने 203.33 च्या स्ट्राइक रेटने फक्त 30 चेंडूत 61 धावा कुटल्या. त्याच्या वेगवान फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 206 धावांचा डोंगर उभारला.
सुरुवातीपासून भारतीय टीमचा संघर्ष
इंडिया चॅम्पियन्सला 207 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारताला 18.2 ओव्हर्समध्ये 200 धावांच टार्गेट मिळालं. इंडिया चॅम्पियन्सची टीम या लक्ष्याचा पाठलाग करताना अडखळली. त्यांच्यासाठी एक-एक धाव डोंगर चढण्यासारखी वाटू लागलेली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर सुरुवातीपासून भारतीय फलंदाजांचा सुरु असलेला संघर्ष शेवटपर्यंत कायम होता. उथप्पा, धवन, रैना, रायडू आणि युवराज सिंग यांनी आपल्या प्रदर्शनाने निराश केलं.
डिविलियर्सची लाजवाब कॅच
IPL मध्ये 37 चेंडूत शतक झळकवणाऱ्या युसूफ पठानला एबी डीविलियर्सने आपल्या लाजबाव फिल्डिंगने ब्रेक लावला. इम्रान ताहीरच्या एका चेंडूवर युसूफ पठाने मोठा फटका खेळला. सीमारेषेपार जाण्याआधीच 41 वर्षाच्या डिविलियर्सने हा चेंडू फक्त रोखलाच नाही, तर आश्चर्यकारक झेलमध्ये बदलला. डिविलियर्सने सीमारेषेवर कॅच पकडून लगेच सहकारी खेळाडूकडे चेंडू फेकला.
𝐏𝐞𝐭𝐢𝐭𝐢𝐨𝐧 𝐭𝐨 𝐠𝐞𝐭 𝐀𝐁 𝐝𝐞 𝐕𝐢𝐥𝐥𝐢𝐞𝐫𝐬 𝐨𝐮𝐭 𝐨𝐟 𝐫𝐞𝐭𝐢𝐫𝐞𝐦𝐞𝐧𝐭 📑✍️
Even after four years away from the game, he’s making the impossible look easy 😮💨#WCL2025 #ABD pic.twitter.com/ixmXJ6YBSK
— FanCode (@FanCode) July 22, 2025
भारतीय टीमने किती धावा केल्या?
इंडिया चॅम्पियन्स टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 18.2 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 111 धावा केल्या. 88 धावांनी भारतीय संघाची हार झाली. WCL 2025 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या या सामन्यात एकूण 8 सिक्स लगावण्यात आले. त्यास सात सिक्स दक्षिण आफ्रिकेने लगावले. 7 पैकी 3 सिक्स डीविलियर्सने मारले. म्हणजे भारतीय टीमला फक्त एक सिक्स मारता आला. सिक्सच्या आकड्यामधील फरकामधून भारताच्या पराभवाच कारण स्पष्ट होतं.
