AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG :भर सामन्यात भारतीय फलंदाजांमध्ये राडा; इंग्लंडविरुद्ध मॅचमध्ये असं काय घडलं? Video Viral

भारत आणि इंग्ल्ड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. फक्त भारतीय संग 20 षटके फलंदाजी करु शकला त्यानंतर पुढे सामना होऊ शकला नाही. आता या 'टी-20 मधील नंबर वन फलंदाजांकडून असं काही घडलं की विश्वास बसेना.

IND vs ENG :भर सामन्यात भारतीय फलंदाजांमध्ये राडा; इंग्लंडविरुद्ध मॅचमध्ये असं काय घडलं? Video Viral
ishan kishan run out
| Updated on: Jul 02, 2026 | 8:32 AM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना काल रंगणार होता पण पावसामुळे रद्द झाला. सामन्याला सुरुवात तर झाली पण तो पूर्ण होऊ शकला नाही. या सामन्याचे नाणेफेक ही श्रेयस अय्यरने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने संपूर्ण 20 षटके फलंदाजी केली. 20 षटकांत भारतीय संघाने 187 धावा केल्या आणि इंग्लंडच्या संघाला लक्ष्यप्राप्ती करण्याची संधी मिळाली नाही कारण पाऊस आला. पावसामुळे सामना रद्द झाला आणि निकाल लागू शकला नाही.

पहिल्या टी-20 सामन्यात  जगातील नंबर एक टी-20 फलंदाज बनल्यानंतर, इशान किशन पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात, अभिषेक शर्मासोबतच्या ताळमेळाच्या अभावामुळे त्याने आपली विकेट गमावली. या दोन खेळाडूंमधील संभाषण स्टंप माइकवर रेकॉर्ड झाले, ज्यामध्ये इशान अभिषेकला म्हणाला, “तो माझा कॉला होता, तू का नाही धावलास?” चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संजू सॅमसनच्या रूपाने पहिली विकेट पडली. या धक्क्यातून टीम इंडिया पूर्णपणे सावरलीही नव्हती, तोच अवघ्या एका चेंडूनंतर इशान किशन धावबाद झाला.

एक धाव घेण्यासाठी त्याने मिड-विकेटच्या दिशेने एक हलकासा फटका मारला, पण चेंडू पटकन क्षेत्ररक्षकाकडे गेला. ईशान मिड-विकेट मार्कपर्यंत पोहोचला तोपर्यंत, नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या अभिषेक शर्माने त्याला परत पाठवले होते. ईशान क्रीजवर परत येण्यापूर्वीच, यष्टीरक्षक जोस बटलरने त्याला धावबाद केले होते. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. यादरम्यान, दोन्ही फलंदाज एकमेकांशी बोलताना दिसले. ईशान म्हणाला, “तू का धावला नाहीस? तो माझा निर्णय होता, नाही का?” अभिषेक शर्माने उत्तर दिले, “तू काय करतो आहेस, चेंडू तर जाऊ दे? तुला काय वाटतं, बाद आहेस की नाही?” त्यावर ईशान म्हणाला, “ते अगदी जवळचं दिसतंय.” रिप्लेमध्ये दिसले की ईशान क्रीजच्या खूप मागे होता.

दोन डावांमध्ये सलग धावबाद ईशान ईशानने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग दुसऱ्यांदा धावबाद होऊन आपली विकेट गमावली आहे. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तिलक वर्मासोबत झालेल्या गोंधळामुळे तो 12 धावांवर धावबाद झाला. 1 जुलै रोजी तो आयसीसी टी20 क्रमवारीत अव्वल फलंदाज बनला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 24 चेंडूंमध्ये 59 धावा करणाऱ्या अभिषेक शर्माकडून त्याने हे अव्वल स्थान पटकावले.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?