Abu Dhabi T10 League | वसीम अहमदचा तडाखा, 12 चेंडूत अर्धशतक, नॉर्थन वॉरियर्सचा पुणे डेव्हिल्सवर शानदार विजय

वसीम मुहम्मदने (Waseem Muhammad) एकूण 13 चेंडूंमध्ये 6 सिक्स आणि 3 चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली.

Abu Dhabi T10 League | वसीम अहमदचा तडाखा, 12 चेंडूत अर्धशतक, नॉर्थन वॉरियर्सचा पुणे डेव्हिल्सवर शानदार विजय
वसीम मुहम्मदची शानदार नाबाद अर्धशतकी खेळी.
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 11:59 AM

यूएई : अबुधाबी टी 10 क्रिकेट लीगमध्ये (Abu Dhabi T10 League) दररोज नवनवीन रेकॉर्ड होत आहेत. अवघ्या 10 ओव्हर्सचा गेम असल्याने फलंदाज तडाखेबाज आक्रमकपणे फलंदाजी करतात. याचाच अनुभव पुन्हा एकदा आला आहे. पुणे डेविल्स (Pune Devils) विरुद्ध नॉर्थन वॉरियर्स (Northern Warriors) यांच्यात 3 फेब्रुवारीला सामना खेळण्यात आला. या सामन्यात नॉर्थन वॉरियर्सच्या वसीम मुहम्मदने (Waseem Muhammad) पुण्याच्या गोलंदाजांची अक्षरक्ष: पिसं काढली.पुण्याने विजयासाठी दिलेले 98 धावांचे आव्हान नॉर्थन वॉरियर्सने अवघ्या 4.3 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. वसीमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर नॉर्थन वॉरियर्सने 8 विकेट्सने पुण्यावर शानदार विजय मिळवला. (abu dhabi t10 league waseem muhammad half century only 12 balls northern warriors beats pune devils by 8 wickets)

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या वॉरियर्सची शानदार सुरुवात राहिली. ब्रॅंडन किंग आणि वसीम मुहम्मद या जोडीने आक्रमक सुरुवात करुन दिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये या दोन्ही ओपनर्सने मोनीर होसेनची (Monir Hossain) बोलिंग चांगलीच चोपली. या दोघांनी या ओव्हरमध्ये एकूण 35 धावा केल्या. या दोघांनी अवघ्या 3. 1 ओव्हरमध्ये 71 धावा जोडल्या. यानंतर किंग 20 धावा करुन बाद झाला.

यानंतर कर्णधार निकोलस पूरन मैदानात आला. मात्र पूरन 6 धावा करुन तंबूत परतला. पण वसीम एका बाजूला जोरदार फटकेबाजी करत होता. दरम्यान त्याने अवघ्या 12 चेंडूमध्ये अर्धशतक लगावले. या स्पर्धेत 12 चेंडूत अर्धशतक लगावण्याची ही तिसरी वेळ ठरली.

वसीमने एकूण 13 चेंडूंमध्ये 6 सिक्स आणि 3 चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली. तर रोवमन पोवेलने नाबाद 14 धावा केल्या. वसीमच्या या ताबडतोड खेळीच्या जोरावर नॉर्थन वॉरियर्सने 8 विकेट्सने 33 चेंडूआधी विजय मिळवला.

त्याआधी वॉरियर्सने टॉस जिंकून पुण्याला फलंदाजीला भाग पाडले. पुण्याने निर्धारित 10 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 97 धावा केल्या. पुण्याकडून कर्णधार नासिर होसनने नाबाद 27 धावा केल्या. तर केनार लेव्हिसने 24 धावा केल्या. वॉरियर्सकडून वेन पार्नेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर वहाब रियाझने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. या विजयामुळे वॉरियर्सने अ गटातील पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

संबंधित बातम्या :

कंगना रोहित शर्माच्या ट्विटवर म्हणाली, हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का !

Ind vs Eng : इंग्लंडविरुद्ध कसोटी, भारताचा ‘हा’ खेळाडू मॅच फिरवू शकतो, माजी क्रिकेटपटूचं भाकीत

(abu dhabi t10 league waseem muhammad half century only 12 balls northern warriors beats pune devils by 8 wickets)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.