Shresta Iyer : ‘ही लाजिरवाणी बाब…’, पंजाबच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरच्या बहिणीची पोस्ट चर्चेत
Shresta Iyer : पंजाब किंग्सच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरच्या बहिणीने सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठाने एका संतापातून हे सर्व लिहिलय. काल पंजाब किंग्सचा सामना संपल्यानंतर असं काय घडलं? त्यामुळे तिला अशी पोस्ट लिहावी लागली.

IPL 2025 मध्ये पंजाब किंग्सला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी झालेल्या सामन्याच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाबला 7 विकेटने हरवलं. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबत पंजाबच्या खेळाडूंचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा सुद्धा त्यामध्ये होती. सामना संपल्यानंतर ती रागात दिसली. पराभवासाठी कुटुंबियांना जबाबदार धरण्याच्या कृतीवर श्रेयस अय्यरची बहिण संतापलेली. श्रेयस अय्यरच्या बहिणीने इन्स्टा स्टोरीमधून आपला संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर पराभवासाठी खेळाडूंच्या कुटुंबियांना जबाबदार धरणाऱ्यांवर श्रेष्ठाने निशाणा साधला.
RCB विरुद्ध सामना सुरु असताना श्रेष्ठा अय्यर भावाची टीम पंजाब किंग्सला सपोर्ट करत होती. पण मॅच संपल्यानंतर तिने इन्स्टा स्टोरीवर जे काही लिहिलं, त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, कुठे ना कुठे ट्रोलर्सच्या कमेंट तिच्या जिव्हारी लागल्या. श्रेष्ठा अय्यरने इन्स्टा स्टोरीवर लिहिलय की, “जे लोक पराभवासाठी कुटुंबाला जबाबदार घरत आहेत, प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास हे खूप निराशाजनक आहे. सत्य हे आहे की, आम्ही तिथे शरीराने उपस्थित असू किंवा कुठे दूर असलो, तरी आमचा टीमला नेहमीच सपोर्ट असतो”
‘…तेव्हा तथ्याला फार महत्त्व नसतं’
“पराभवासाठी मला जबाबदार धरण्याच्या प्रवृत्तीवर फक्त हसूच येत नाहीय, तर ही लाजिरवाणी बाब आहे. मी याआधी तिथे अनेक सामन्यांना उपस्थित होती. ते सामने टीम इंडियाचे असो किंवा अन्य दुसरे कुठले. त्यातले बहुतांश सामने जिंकले आहेत. पण जेव्हा तुम्ही ट्रोलिंगमध्ये व्यस्त असता, तेव्हा तथ्याला फार महत्त्व नसतं” असं श्रेष्ठाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘अशी कृती करण्याआधी दोनदा विचार करा’
“मी माझा भाऊ आणि त्याच्या टीमची पहिल्यापासून मोठी सपोर्टर आहे. त्यामुळे तुमच्या अर्थहीन कमेंट्सनी मला फरक पडत नाही. टीम जिंको किंवा हरो, माझा सपोर्ट नेहमीच आहे आणि यालाच सपोर्टर म्हणतात” असं श्रेयस अय्यरच्या बहिणीने लिहिलं आहे. “नक्कीच हा दिवस पंजाब किंग्सचा नव्हता. पण जय-पराजय खेळाचा भाग आहे. ऑनलाइन ट्रोलिंगशिवाय तुम्ही दुसरा विचार कराल, तेव्हा या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. त्यामुळे पुढच्यावेळी अशी कृती करण्याआधी दोनदा विचार करा” असं श्रेष्ठा अय्यरने सुनावलं आहे.

बंगळुरुचा आरामात विजय
या सामन्यात पंजाब किंग्सने पहिली फलंदाजी केली. त्यांनी RCB समोर विजयासाठी 158 धावांच लक्ष्य ठेवलं. बंगळुरुने आरामात 18.5 ओव्हर्समध्ये 3 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं.
