Ind vs Eng : भारताला मोठा झटका ! पंतनंतर हा स्टार खेळाडूही 5 व्या टेस्टमधून बाहेर
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 मधील शेवटची मॅ ही ओव्हल ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहे. मात्र या मॅचपूर्वीच भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. ऋषभ पंतनंतर टीम इंडिय़ाचा एक महत्वाचा स्टार खेळाडू या मॅचमध्ये खेळणार नाहीये. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने हा निर्णय घेतला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. इंडियन टीमचा स्टार यष्टीरक्षक, फलंदाज ऋषभ पंत हाँ दुखापतीमुळे या महत्त्वाच्या सामन्यातून आधीच बाहेर पडला आहे. त्यातच आता, बीसीसीआयच्या मेडिकल टीमने आणखी एका मोठ्या खेळाडूला या सामन्यातून बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मालिका अनिर्णित राहण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल, त्यामुळे या मोठ्या दुसऱ्या खेळाडूला वगळणे हा संघासाठी मोठा धक्का आहे.
पंतनंतर हा खेळाडूही 5 व्या टेस्टमधून बाहेर
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळणार नाही. हा सामना येत्या गुरुवारपासून, अर्थात उद्यापासून लंडनमधील ओव्हल मैदानावर सुरू होणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने बुमराहला त्याच्या पाठीच्या आरोग्याचा विचार करून या सामन्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्याचे भविष्य सुरक्षित राहील. हा निर्णय फार काही आश्चर्यकारक नाही, कारण या इंग्लंड दौऱ्यात बुमराह हाँ पाचपैकी फक्त तीन कसोटी सामने खेळेल हे आधीच ठरले होते. बुमराहने हेडिंग्ले येथे पहिली कसोटी खेळली, बर्मिंगहॅम येथे दुसरी कसोटी गमावली, नंतर लॉर्ड्स आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला. म्हणजेच या सीरिजमध्ये तो आधीच तीन सामने खेळलेला आहे.
ओव्हल कसोटीपूर्वी तीन दिवसांचा ब्रेक मिळाल्यानंतरही, टीम इंडियाने बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. टीम मॅनेजमेंट ही योजना बदलू शकली असते, कारण, ओव्हलमधील विजयामुळे भारताला या मालिकेत 2-2 शी बरोबरी साधता आली असती. पण बुमराची तंदुरुस्ती आणि दीर्घकालीन नियोजन लक्षात घेऊन त्याला विश्रांती देण्यात आली आहे. ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत बुमराच्या गोलंदाजीवरही थकव्याचा परिणाम दिसून आला. त्याने 33 ओव्हर्समधये दोन विकेट्स घेतल्या. तसेच, त्याच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच त्याने एका डावात 100 पेक्षा जास्त धावा दिल्या.
कोणत्या गोलंदाजाची होणार एंट्री ?
ओल्ड ट्रॅफर्ड येथे, गौतम गंभीरने पुष्टी केली की त्यांचे सर्व वेगवान गोलंदाज तंदुरुस्त आहेत, याचा अर्थ अर्शदीप सिंग आणि आकाश दीप त्यांच्या दुखापतींमधून बरे झाले आहेत. अशा परिस्थितीत, आकाश दीप हा प्लेइंग 11 मध्ये परतण्यासाठी एक मोठा दावेदार ठरू शकतो, त्याने या मालिकेतील टीम इंडियाच्या एकमेव विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, अर्शदीप सिंग देखील तंदुरुस्त झाला आहे, त्यामुळे त्यालाही कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते.
